शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’चा आज पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 06:17 IST

थकीत एफआरपीचा प्रश्न; खासदार राजु शेट्टी करणार नेतृत्व

कोल्हापूर : थकीत एफआरपीपोटी साखर कारखान्यांकडील साखर विक्री करून, शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. या मागणीसाठी आज, सोमवारी सकाळी ११ वाजता खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. साखर जप्तीचे आदेश काढल्याशिवाय न हलण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतला आहे.राज्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केल्याने हजारो कोटींची एफआरपी थकीत आहे. उसाचे गाळप झाल्यापासून १४ दिवसांत शेतकºयांना एफआरपीप्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे; पण कारखान्यांनी कायद्याचे तुकडे केल्याचा आरोप ‘स्वाभिमानी’चा आहे. कारखानदार खुशाल कायदा मोडत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे.कारखान्यांना आमचे पैसे देता येत नसतील, तर कायद्यातील तरतुदीनुसार साखर आयुक्तांनी साखर जप्त करावी, त्याची विक्री करून शेतकºयांना प्राधान्याने पैसे द्यावेत. या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वाभिमानी’चे राज्यातील कार्यकर्ते पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर धडक देणार आहेत.गत हंगामातील २७० कोटी थकीतराज्यातील अनेक कारखान्यांकडे २७० कोटींची गेल्या हंगामातील एफआरपी थकीत आहे. विशेष म्हणजे या कारखान्यांकडे एक किलोही साखर शिल्लक नसल्याने थकीत एफआरपीचा पेच आहे.मागील अनुभव पाहता उर्वरित एफआरपी मिळण्याची खात्री नाही. गेल्या हंगामातील एफआरपी थकीत आहे; पण त्यांच्याकडे एक किलोही साखर शिल्लक नाही, आता पैसे कसे वसूल करायचे. साखर विक्री करून पहिले शेतकºयांचे पैसे द्यावे, यासाठी ही लढाई आहे.- राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने