स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुणाच्या परवानगीची वाट पाहताय
By Admin | Updated: April 23, 2017 20:24 IST2017-04-23T20:11:19+5:302017-04-23T20:24:08+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळालाच पाहिजे. आता केंद्रात सरकारही आपलेच आहे.

स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुणाच्या परवानगीची वाट पाहताय
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 23 - स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळालाच पाहिजे. आता केंद्रात सरकारही आपलेच आहे. मग सावरकरांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्यासाठी कुणाच्या परवानगीची वाट पाहताय, असा सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.
29व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न मिळालच पाहिजे. आपल्या देशात कोणते रत्न जन्माला आले हे जगाला कळावे म्हणून हा पुरस्कार मिळायला हवा. आता केंद्रात सरकार आपलेच असताना सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज आहे. यावेळी सावरकरप्रेमींना सावरकर किती समजले हा मोठा प्रश्न आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
सावरकर संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमास राज्यसरकारमधील शिक्षणमंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. त्यांनीही सावरकरांना भारतरत्न देण्याविषयीची आपली भूमिका मांडली. "सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचली आहे आणि त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच वीर सावरकर यांचे विचार शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत आणखी प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार नक्कीच करेल, असेही ते म्हणाले.