वाघाचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: January 20, 2016 02:49 IST2016-01-20T02:49:13+5:302016-01-20T02:49:13+5:30
सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील १८वर्षीय रॉयल बेंगॉल टायगर ‘गुड्डू’चा मंगळवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाला.

वाघाचा संशयास्पद मृत्यू
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील १८वर्षीय रॉयल बेंगॉल टायगर ‘गुड्डू’चा मंगळवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाला. आता उद्यानात फक्त ४ मादी, २ नर वाघ शिल्लक राहिले आहेत. गुड्डूच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यूच्या कारणाचा उलगडा होणार आहे.
पंजाबच्या चतबीर येथील महेंद्रसिंह चौधरी उद्यानातून २वर्षीय गुड्डू आणि दीप्तीला औरंगाबादेत आणण्यात आले होते. सायंकाळी त्याने जेवणही केले. मंगळवारी सकाळी त्यांची देखभाल करणारे चंद्रकांत काळे यांना गुड्डू जमिनीवर कोसळल्याचे आढळले. दुपारी ३ वाजता खडकेश्वर येथील सहायक आयुक्त डॉ. देवरे, पशुधन विकास अधिकारी विलास काळे यांनी ‘गुड्डू’चे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात त्यांनी ‘मल्टी आॅरगन फेल्युअर’ असे नमूद करण्यात आले आहे. पुढील तपासणीसाठी गुड्डूची किडनी, हृदय आदी अवयव पुण्याला प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.