मुंबई विमानतळाजवळ दिसला संशयित बलून, हाय अलर्ट जारी
By Admin | Updated: October 5, 2016 18:04 IST2016-10-05T18:02:36+5:302016-10-05T18:04:59+5:30
मुंबई विमानतळाजवळ संशयित फुगा दिसल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई विमानतळाजवळ दिसला संशयित बलून, हाय अलर्ट जारी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - मुंबई विमानतळाजवळ संशयित फुगा दिसल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एअर इंडियाच्या वैमानिकांना विमान जमिनीवर लँड करत असताना मुंबईपासून 25 किलोमीटरच्या अंतरावर हा फुगा दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
एअर इंडियाच्या वैमानिकांनी या संशयित फुग्याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाला दिली असून, एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागानं या संशयित फुग्याची माहिती मुंबई पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर विभागाला दिली. संशयित फुगा हा नागपूर-मुंबई विमान जमिनीवर लँड करत असताना वैमानिकांना छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून 25 किलोमीटरच्या अंतरावर दिसला आहे.
भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सद्वारे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून ४० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यापार्श्वभूमीवर दहशतवाद्यांकडून घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं भारतात हाय अलर्ट देण्यात आला होता. आता हा फुगा दिसल्यानं मुंबईत हाय अलर्ट देण्यात आलं आहे.
तत्पूर्वी पंजाबमध्ये मंगळवारी सकाळी रावी नदीच्या पात्रामध्ये एक संशयित बोट आढळून आली होती. बीएसएफच्या जवानांनी ही संशयित बोट ताब्यात घेतली आहे. या बोटीवर पाकिस्तानचे निशाण असल्याचीही माहिती समोर आली आहे. ही बोट दहशतवाद्यांची असल्याचा संशय असल्यामुळे याबाबत अधिक तपास सुरू आहे. तसंच आसपासच्या परिसरात हाय अलर्ट जारी करुन सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
Pilot reported a balloon while landing of Air India 628 Nagpur to Mumbai flight at Mumbai airport, reported incident to Air Traffic Control
— ANI (@ANI_news) October 5, 2016