पाणीकपातीच्या निर्देशांना स्थगिती
By Admin | Updated: October 7, 2015 03:53 IST2015-10-07T03:53:14+5:302015-10-07T03:53:14+5:30
भातसा धरणातील पाणीसाठा कमी असल्याने मुंबई आणि ठाणे महापालिकांना ४० टक्के पाणीकपातीच्या राज्य शासनाच्या निर्देशांना मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली.

पाणीकपातीच्या निर्देशांना स्थगिती
मुंबई : भातसा धरणातील पाणीसाठा कमी असल्याने मुंबई आणि ठाणे महापालिकांना ४० टक्के पाणीकपातीच्या राज्य शासनाच्या निर्देशांना मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली.
भातसा धरणातून मुंबई महापालिकेला २१२० दशलक्ष घनमीटर तर ठाणे महापालिकेला २०० दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा होतो. या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे भातसा धरणातील पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे ५ सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने दोन्ही महापालिकांना ४० टक्के पाणीकपात करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात सुमारे १ लाख दशलक्ष लीटर वाढ झाली. तसेच कपातीची सूचना देण्यापूर्वीच मुंबई महापालिकेने २६ आॅगस्टपासून मुंबईत १५ टक्के कपात लागू केली असल्याने या कपातीचा फेरविचार करावा, अशी विनंती महापालिकेने शासनाला केली होती. मात्र त्याबाबत निर्णय न झाल्याने मुंबई भाजपाध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत ४० टक्के कपात लागू करू नये अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ५ सप्टेंबरच्या पत्राला स्थगिती दिली. सध्या मुंबईत १५ टक्के पाणीकपात सुरू असून, त्याबाबत पाणीसाठ्याचा फेरआढावा घेऊन पुढील निर्णय घ्यावा आणि त्याबाबत राज्य शासनाला कळवावे अशी चर्चा या बैठकीत झाली.