शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेला ठाकरेंच्या शिलेदाराला कडवं आव्हान देणाऱ्या बंडखोर काँग्रेस नेत्याचे निलंबन मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:22 IST

रामटेकमधील या बंडखोरीमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. रामटेक जागेची अदलाबदल करण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेसने बरेच प्रयत्न केले परंतु ठाकरेंनी ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला

नवी दिल्ली  - गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी केल्याने निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे निलंबन आज औपचारिकरित्या मागे घेण्यात आले. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. 

आज दिल्ली येथे राजेंद्र मुळक गेले असता त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याबद्दल राजेंद्र मुळक यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. मात्र आज पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुळक यांचे पुन्हा पक्षात स्वागत करून निलंबन मागे घेतल्याचे अधिकृतरित्या घोषित केले.

कोण आहे राजेंद्र मुळक?

राजेंद्र मुळक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आघाडी होती. त्यात नागपूरातील रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच होती. या जागेवर २०१९ साली आशिष जयस्वाल निवडून आले होते. त्यामुळे ही जागा शिवसेनेची आहे ती सोडावी असा आग्रह ठाकरे गटाने काँग्रेसकडे केला. अखेर दोन्ही बाजूच्या चर्चेत रामटेकची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली. मात्र यावरून नाराज झालेल्या राजेंद्र मुळक यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. 

रामटेकमधील या बंडखोरीमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. रामटेक जागेची अदलाबदल करण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेसने बरेच प्रयत्न केले परंतु ठाकरेंनी ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला. त्यामुळे या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा झाला. त्यात रामटेक मतदारसंघात राजेंद्र मुळक यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे ठाकरे गटाची कोंडी झाली. याठिकाणी ठाकरे गटाने विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली. परंतु या मतदारसंघात ना ठाकरे गट, ना अपक्ष राजेंद्र मुळक यांच्याऐवजी महायुतीकडून आशिष जयस्वाल यांचा विजय झाला. 

टॅग्स :Rajendra Mulakराजेंद्र मुळकcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेramtek-acरामटेकElectionनिवडणूक 2024