काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन मागे
By Admin | Updated: December 23, 2014 18:30 IST2014-12-23T18:30:53+5:302014-12-23T18:30:53+5:30
राज्यपालांना धक्काबुक्की केल्याने निलंबनाची कारवाई झालेल्या पाच आमदारांना मंगळवारी दिलासा मिळाला असून या पाचही आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले.
काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन मागे
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ - राज्यपालांना धक्काबुक्की केल्याने निलंबनाची कारवाई झालेल्या पाच आमदारांना मंगळवारी दिलासा मिळाला आहे. या पाचही आमदारांचे निलंबन मागे घेत असल्याची माहिती राज्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली.
गेल्या महिन्यात भाजपाने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर विधीमंडळात राज्यपालांचे अभिभाषण होणार होते. राज्यपालांना विधीमंडळात पोहोचू न देण्याची रणनिती काँग्रेसने आखली होती. यानुसार राज्यपालांची गाडी अडवण्यात आली तसेच आमदारांना विधीमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्यादेखील मांडला. मात्र विरोध प्रदर्शन करणा-या काँग्रेसच्या काही आमदारांनी थेट राज्यपालांना धक्काबुक्की केली. यासाठी राहुल बोंद्रे (चिखली), वीरेंद्र जगताप (धामणगाव), जयकुमार गोरे (माण), अमर काळे (आर्वी) आणि अब्दुल सत्तार (सिल्लोड) अशा पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. मंगळवारी हे निलंबन मागे घेण्यात आल्याचे बापट यांनी जाहीर केले.