शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

जात पडताळणी प्रकरणी ना निलंबन, ना बदली!

By यदू जोशी | Updated: August 2, 2018 02:00 IST

वांद्रे, मुंबई येथील जात पडताळणी समितीच्या अधिका-यांनी सगुण नाईक यांना लाच मागितली आणि नाईक यांनी ती न दिल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याचे सांगत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (१६ जुलै) अनिल परब यांनी अधिका-यांवर कारवाईची मागणी केली होती.

मुंबई : शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक सगुण नाईक यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केल्यानंतर संबंधित तिन्ही अधिका-यांना तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश सभापतींनी दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी सामाजिक न्याय विभागाने अद्याप केलेली नाही.वांद्रे, मुंबई येथील जात पडताळणी समितीच्या अधिका-यांनी सगुण नाईक यांना लाच मागितली आणि नाईक यांनी ती न दिल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याचे सांगत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (१६ जुलै) अनिल परब यांनी अधिका-यांवर कारवाईची मागणी केली होती. सर्वच पक्षाच्या सदस्यांनी त्यास पाठिंबा दिला होता.सभागृहाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी जात पडताळणी समितीच्या अध्यक्ष चित्रा सूर्यवंशी, सदस्य अरविंद वळवी आणि अविनाश देवसटवार यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. मात्र, १५ दिवस उलटल्यानंतर निलंबनाच्या आदेशासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने कुठलीही कारवाई केलेली नाही.दुसरे एक प्रकरण विधानसभेत भाजपाचे ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले होते. जात पडताळणी समितीच्या सदस्य उपायुक्त वैशाली हिंगे यांच्यावर त्यांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. ३२ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यांचा उल्लेख करून जातप्रमाणपत्र देताना हिंगे यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी हिंगे यांची बदली करून नंतर विभागाच्या सहसचिवांमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. तेही तूर्तास हवेतच आहे.निलंबन वेगळ्याच कारणानेवसंतराव नाईक महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक शरद बनसोड यांना निलंबित करण्याची घोषणा एकदा एका प्रकरणात राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सभागृहात केली आणि नंतर बनसोड यांचे निलंबन झालेच नाही. वर्षभरानंतर भलत्याच प्रकरणात बनसोड निलंबित झाले होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र