एफडीआयच्या साहाय्यक आयुक्तांचे निलंबन

By Admin | Updated: December 8, 2014 02:58 IST2014-12-08T02:58:22+5:302014-12-08T02:58:22+5:30

उस्मानाबाद येथे अन्न व औषध प्रशासनात साहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या सं. श. काळे यांना निलंबित केले असून,

Suspension of Assistant Commissioner of FDI | एफडीआयच्या साहाय्यक आयुक्तांचे निलंबन

एफडीआयच्या साहाय्यक आयुक्तांचे निलंबन

मुंबई : उस्मानाबाद येथे अन्न व औषध प्रशासनात साहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या सं. श. काळे यांना निलंबित केले असून, त्यांच्यावर विभागीय चौकशी लावण्याचे आदेश प्रशासनाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिले आहेत.
काळे हे २५ मे २०११ पासून मुंबईत औषध निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यामार्फत कायद्याची अंमलबजावणी करून घेण्याची पर्यवेक्षकीय जबाबदारी त्यांच्यावर होती. काळे कार्यरत असताना एकूण २९१ प्रकरणांवर त्यांनी कार्यवाही न करता प्रकरणे प्रलंबित ठेवली होती. यामध्ये १७० प्रकरणे ही अन्न विभागाशी निगडीत होती, तर १२१ प्रकरणे ही औषध विभागाची होती. इतकी प्रकरणे प्रलंबित असल्याचे साहाय्यक आयुक्त (गुप्तवार्ता) माधुरी पवार व सह आयुक्त (दक्षता) यांनी आयुक्तांच्या निर्दशनास आणून दिले, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे, असे आयुक्त भापकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Suspension of Assistant Commissioner of FDI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.