शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांच्यावर केवळ द्वेषापोटी निलंबनाची कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसचा निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 18:20 IST

आज हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी  सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून घटना घडली आहे, असे रविकांत वरपे म्हणाले.

मुंबई : विधानसभा अध्यक्षांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. 

आज हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी  सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून घटना घडली आहे, असे रविकांत वरपे म्हणाले. तसेच, महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील सुसंस्कृत राजकारणी, अभ्यासू,संयमी नेते म्हणून ओळखले जातात. ज्यांची मागणी होती की सभागृहात लोकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात यावी, मात्र आज विधानसभेच्या कामकाजात दिशा सालियानच्या विषयावर बदनामी करू नका अशी तिच्या आई- वडिलांची इच्छा असूनही सत्ताधारी पक्षाचे १४ लोकप्रतिनिधी बोलतात. मात्र विरोधी पक्षाच्या एकच लोकप्रतिनिधीला बोलू दिले जात नाही. हा विरोधी पक्षावर अन्याय आहे, असे रविकांत वरपे यांनी सांगितले. याचबरोबर, सत्ताधारी पक्ष सत्तेत असताना देखील विधानसभेत आंदोलन करतात. यासाठी विधानसभेचे कामकाज ५ वेळा तहकूब केले जाते. या सरकारच्या कामकाजा विरोधात जयंत पाटील यांनी आवाज उठवला. त्यांनी कुठलाही असंसदीय शब्द वापरला नाही. पंरतु केवळ द्वेषापोटी या हुकुमशाही शिंदे-फडणवीस सरकारने जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. याचा निषेध करतो. मात्र जयंत पाटील यांच्या मागे संपूर्ण राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष उभा असून या हुकुमशाही सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले जाईल, असेही रविकांत वरपे म्हणाले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलnagpurनागपूर