शासकीय निधीतील ‘शुक्राचार्य’ निलंबित

By Admin | Updated: October 9, 2015 02:00 IST2015-10-09T02:00:38+5:302015-10-09T02:00:38+5:30

शासकीय निधीचा ११ कोटी रुपयांचा गैरवापर केल्याबद्दल आदिवासी विकास मंत्रालयाने प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाड यास निलंबित केले आहे.

Suspended 'Shukracharya' in government funding | शासकीय निधीतील ‘शुक्राचार्य’ निलंबित

शासकीय निधीतील ‘शुक्राचार्य’ निलंबित

मुंबई : शासकीय निधीचा ११ कोटी रुपयांचा गैरवापर केल्याबद्दल आदिवासी विकास मंत्रालयाने प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाड यास निलंबित केले आहे.
आदिवासी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेचे वाटप चुकीच्या पद्धतीने संस्था व व्यक्तींना केल्याचा ठपका शुक्राचार्य दुधाड या प्रकल्प अधिकाऱ्यावर ठेवून त्याच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे. दुधाड यांची २०१३ मध्ये तळोदा येथे बदली झाली होती.
जून २०१५ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. समितीच्या अहवालानंतर आदिवासी विकास विभागाचे मंत्री, आदिवासी विभागाचे सचिव व आयुक्त यांच्या त्रिसदस्यीय समितीने दुधाड यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
आदिवासी खात्यातील अधिकाऱ्यांच्या कामात आणि व्यवहारात पारदर्शकता आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून
या कारवाईचाच एक भाग म्हणून संबंधित प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे,
असे आदिवासी विकासमंत्री
विष्णू सावरा यांनी सांगितले.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Suspended 'Shukracharya' in government funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.