शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित पोलिसाने पळविली ६० काडतुसे, वरिष्ठांकडून प्रकरण लपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 05:38 IST

पोलिसांकडून संरक्षणार्थ वापरली जाणारी जिवंत काडतुसे (बुलेट्स) चोरीला जाण्याची घटना वरळी पोलीस मुख्यालयातील सशस्त्र दलात (एलए-३) शनिवारी रात्री घडली. एका निलंबित पोलिसाने हे कृत्य केल्याने मुख्यालयात गोंधळ उडाला होता.

जमीर काझी/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पोलिसांकडून संरक्षणार्थ वापरली जाणारी जिवंत काडतुसे (बुलेट्स) चोरीला जाण्याची घटना वरळी पोलीस मुख्यालयातील सशस्त्र दलात (एलए-३) शनिवारी रात्री घडली. एका निलंबित पोलिसाने हे कृत्य केल्याने मुख्यालयात गोंधळ उडाला होता. मात्र श्वान पथकाच्या मदतीने अवघ्या तासाभरात काडतुसांचा माग काढण्यात आला.हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा गवगवा होऊ नये, यासाठी हे प्रकरण गोपनीय ठेवण्यात येत आहे. तथापि, वायरलेसवरून त्याबाबतचे ‘मेसेज’ गेल्याने त्याची पोलीस दलात चर्चा सुरू होती. वरिष्ठ अधिकाºयांनी त्याबाबत मौन बाळगले आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस दलाच्या चार सशस्त्र विभागांपैकी (एलए) वरळी येथे एलए-३ विभाग आहे. तेथे स्टोअर रूममध्ये पोलिसांच्या बंदोबस्ताची साधने, हत्यारे ठेवली जातात. शनिवारी रात्री एक निलंबित असलेला हवालदार तेथे गेला. ड्यूटीवरील पोलिसाबरोबर गप्पा मारताना त्याने ६० जिवंत काडतुसे असलेला पट्टा घेतला. तो पिशवीत घालून तो निघून गेल्यानंतर सुरक्षारक्षकाच्या हा प्रकार लक्षात आला. सशस्त्र दलाच्या प्रमुख अपर आयुक्त अस्वती दोरजे व सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांना त्याची कल्पना देण्यात आली.तक्रार नोंदविण्याचे टाळलेश्वान पथकाने मुख्यालयातील कपाटापासून हवालदारापर्यंत माग काढला. तास-सव्वा तासाच्या शोध मोहिमेनंतर सर्व ६० काडतुसे व्यवस्थित मिळाल्याने याबाबत तक्रार न नोंदविण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाºयांनी घेतला. निलंबित हवालदार व सुरक्षारक्षकाची चौकशी करून कारवाईचे आदेश अधिकाºयांना देण्यात आले आहेत. सहआयुक्त देवेन भारती यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.मी काही सांगू शकत नाहीजिवंत काडतुसे हरविल्याची आमच्याकडे काहीही नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे मी काहीच सांगू शकत नाही. तुम्ही काही लिहू नका.- गजानन बेचूरकर, वरिष्ठ निरीक्षक, वरळी पोलीस ठाणेघटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी वरळीतील मुख्यालयात धाव घेतली. निलंबित पोलिसाने जिवंत काडतुसे चोरल्याचे लक्षात आल्याने त्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले.प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने निलंबित हवालदाराने काडतुसाची पिशवी मुख्यालयापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर जुन्या पेट्रोल पंपाजवळील मैदानात ठेवली. 

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा