पाच आमदार निलंबित
By Admin | Updated: November 13, 2014 02:17 IST2014-11-13T02:17:24+5:302014-11-13T02:17:24+5:30
अभिभाषणासाठी आलेल्या राज्यपालांना घातलेला घेराव व त्यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले.

पाच आमदार निलंबित
राज्यपालांना घेराव : धक्काबुक्कीत हाताला जखम
2 वर्षासाठी काँग्रेसच्या पाच जणांवर कारवाईचा बडगा
मुंबई : अभिभाषणासाठी आलेल्या राज्यपालांना घातलेला घेराव व त्यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले.
राज्यपालांचे अभिभाषण दुपारी चार वाजता होते. मात्र त्यासाठी राज्यपालांना सभागृहात पोहोचू न देण्याची रणनीती काँग्रेसने आखली. ‘राज्यपाल चले जाव’च्या घोषणा देणो सुरू झाले, त्यांची गाडी अडवली गेली आणि त्यांना धक्काबुक्की करण्यार्पयत आमदारांची मजल गेली. त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. राहुल बोंद्रे (चिखली), वीरेंद्र जगताप (धामणगाव), जयकुमार गोरे (माण), अमर काळे (आर्वी) आणि अब्दुल सत्तार (सिल्लोड) अशा पाच आमदारांचे
निलंबन करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर करण्यात आली.
हे निलंबन दोन वर्षासाठी आहे. मात्र गिरीश बापट, एकनाथ शिंदे, आर. आर. पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, गणपतराव देशमुख यांची समिती नेमण्यात आली आणि हिवाळी अधिवेशनात त्यांना अहवाल सादर करण्याचे सांगण्यात
आले आहे. घेराव-घोषणांच्या गोंधळात
परिणामी राज्यपालांचे भाषण 1क् मिनिटे उशिराने सुरू झाले.
सभागृहात काँग्रेसकडून दिलगिरी
राज्यपालांचे अभिभाषण उशिरा सुरू होण्याची ही राज्यातली पहिलीच वेळ आहे. राज्यपालांचे भाषण चालू असतानाही काँग्रेसचे सदस्य जोरदार घोषणाबाजी करीतच होते. झालेल्या प्रकाराबद्दल गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. तर सभागृहात बहुमत सिद्ध झालेले नाही, केवळ 122 सदस्यांच्या सह्या देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे, जे बेकायदेशीर आहे. घटनेनुसार हे राज्य चालत नाही आणि नियमबाह्य पद्धतीने त्यांनी सरकार स्थापन केले आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी या वेळी दिली.
राज्यपाल अभिभाषण करण्यासाठी आले तेव्हा आमचे म्हणणो ऐकून घ्या, हे सांगण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांनी पाय:यांवर घेराव घातला व घोषणा दिल्या.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.