निलंबित दया नायक यांचा पुन्हा पोलीस दलात समावेश.

By Admin | Updated: January 11, 2016 22:27 IST2016-01-11T22:08:02+5:302016-01-11T22:27:55+5:30

वर्षभरापुर्वी बदली होऊनही कामावर रुजू न झालेले निलंबित पोलिस अधिकारी (एन्काउंटर स्पेशालिस्ट) दया नायक यांचे निलंबन माघारी घेण्यात आले आहे.

Suspended Daya Nayak was again included in the police force. | निलंबित दया नायक यांचा पुन्हा पोलीस दलात समावेश.

निलंबित दया नायक यांचा पुन्हा पोलीस दलात समावेश.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ - वर्षभरापुर्वी बदली होऊनही कामावर रुजू न झालेले  निलंबित पोलिस अधिकारी (एन्काउंटर स्पेशालिस्ट) दया नायक यांचे निलंबन माघारी घेण्यात आले आहे. त्यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात आपल्या पदावर कायम राहण्यास सांगीतले आहे. 
मागील वर्षी त्यांची नागपुरात बदली झाली होती पण ते कामावर रुजू न झाल्याने कारवाई त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास टाळाटाळ केल्यामुळे एखाद्या नामवंत तेवढ्याच वादग्रस्त पोलीस अधिका-याला निलंबित करण्यात आल्याची ही पहिलीच घटना होती. त्या घटनेमुळे पोलिस दलात चर्चेला उधान आले होते. 
अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांसोबतच अनेक खतरनाक टोळळ्यातील गुंडांना यमसदनी धाडणा-या दया नायकला काही वर्षांपुर्वी पोलीस दलासह सामान्य नागरिकांनीही डोक्यावर घेतले होते.
एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्याचा उदोउदो होत होता. याच दरम्यान तो एका टोळीतील गुंडांकडून दुस-या टोळीतील गुंडांचा गेम करण्यासाठी सुपारी घेत असल्याची जोरदार चर्चावजा आरोप झाले आणि दया नायक वादग्रस्त झाला. त्याची चौकशी झाली आणि त्याला निलंबितही करण्यात आले. दोन वर्षांपुर्वी तो पुन्हा नोकरीत रुजू झाला. गेल्या वर्षी त्याची नागपूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली. मात्र, वरिष्ठांशी लागेबांधे आणि ब-यापैकी राजकीय पाठबळ असल्यामुळे दया नायक नागपूर परिक्षेत्रात रुजू व्हायला तयार नव्हता. वारंवार सूचनापत्र, आदेश देऊन तो नागपूरात यायला तयार नसल्यामुळे अखेर पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी  नायक यांना निलंबित केले होते.
 

 

Web Title: Suspended Daya Nayak was again included in the police force.