महिनाभरातील शासन निर्णयांना स्थगिती द्या
By Admin | Updated: September 10, 2014 03:00 IST2014-09-10T03:00:52+5:302014-09-10T03:00:52+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध योजना मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे.

महिनाभरातील शासन निर्णयांना स्थगिती द्या
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध योजना मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी गेल्या महिनाभरात तब्बल १ हजार ७१ अध्यादेश जारी करण्यात आले आहेत. त्याला खासदार राजू शेट्टी यांनी आक्षेप घेतला असून, मतदारांना प्रलोभित करण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय तत्काळ स्थगित करावेत, अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.
राज्य सरकारने ५ आॅगस्ट ते ६ सप्टेंबर २०१४ या कालावधीत मोठ्या प्रमाणावर अध्यादेश काढले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभित करण्यासाठी सरकारच्या वतीने असे निर्णय जाहीर करण्यात येत आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात घेण्यात आलेल्या सर्व निर्णयास स्वाभिमानी पक्षाच्या वतीने हरकत घेण्यात येत असून हे निर्णय त्वरित स्थगित करावेत, तसेच अत्यंत आवश्यक असलेल्या निर्णयांनाच मान्यता देण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र खासदार शेट्टी यांनी राज्यपालांना पाठविले आहे.