अमरावतीच्या एसपींना निलंबित करा - विखे-पाटील

By Admin | Updated: August 28, 2015 00:59 IST2015-08-28T00:59:00+5:302015-08-28T00:59:00+5:30

विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक लख्मी गौतम यांच्या निलंबनाची मागणी केली. माहुली गावाला भेट दिल्यानंतर

Suspend Amaravati SP - Vikhe-Patil | अमरावतीच्या एसपींना निलंबित करा - विखे-पाटील

अमरावतीच्या एसपींना निलंबित करा - विखे-पाटील

अमरावती : विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक लख्मी गौतम यांच्या निलंबनाची मागणी केली. माहुली गावाला भेट दिल्यानंतर गुरुवारी अमरावती येथे ते पत्रपरिषदेला संबोधित करीत होते.
माहुली गाव शांतताप्रिय आहे; कुठलेही कारण नसताना पोलिसांनी निरपराध गावकऱ्यांवर लाठीमार केला. लख्मी गौतम हेच त्यासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांचे तत्काळ निलंबन करावे, पोलिसांनी केलेल्या झुंडशाहीची न्यायालयीन चौकशी करावी आणि निरपराध गावकऱ्यांवर लावलेले
दंगल आणि दरोड्याचे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, अशा मागण्या त्यांनी या वेळी केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी भेटून आपण ही मागणी करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Suspend Amaravati SP - Vikhe-Patil