शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

तूर, उडदाच्या साठेबाजीचा संशय; मुंबई, अकोला, लातूर, सोलापूर रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 08:44 IST

Mumbai: तूर आणि उडद या डाळींची संभाव्य साठेबाजी रोखण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने पावले उचलली असून, राज्यातील मुंबई, अकोला, लातूर आणि सोलापूर हे चार जिल्हे रडारवर आहेत.

नवी दिल्ली : तूर आणि उडद या डाळींची संभाव्य साठेबाजी रोखण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने पावले उचलली असून, राज्यातील मुंबई, अकोला, लातूर आणि सोलापूर हे चार जिल्हे रडारवर आहेत.

डाळ व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या साठ्यांची नियमित आणि प्रामाणिकपणे माहिती न दिल्यास अघोषित साठे जप्त करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिला आहे. तूर आणि उडद डाळींच्या साठ्यांचा साप्ताहिक आढावा घेण्यासाठी  ग्राहक संरक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या चार राज्यांतील १० शहरांमध्ये तूर आणि उडदडाळीच्या साठ्यांचे वास्तव जाणून घेण्यासाठी गेल्या आठवड्यात ग्राहक संरक्षण विभागाने आपल्या १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले होते. 

व्यापारी, आयातदारांनी माहिती लपवलीमहाराष्ट्रातील मुंबई, अकोला, लातूर, सोलापूरसह इंदूर, सालेम, चेन्नई, कलबुर्गी, जबलपूर आणि कटनी येथे अधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे अधिकारी, डाळ मिलचे मालक, व्यापारी, आयातदार आणि बंदरांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डाळींचे व्यापारी आणि आयातदार माहिती लपवत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. 

चेन्नई बंदरातून तूरडाळीची आयातडाळींच्या बाजारपेठांना भेटी देऊन व्यापाऱ्यांशी चर्चा करणाऱ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत ग्राहक संरक्षण खात्याचे सचिव रोहितकुमार सिंह यांची बैठक झाली. तेलंगण, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे व्यापारी चेन्नई बंदराच्या माध्यमातून तूरडाळीची आयात करीत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

डाळ महागलीवर्षभरात तूरडाळीच्या दरात १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडत आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रति क्विंटल ९ हजार १२५ रुपये दर होता. तोच या वर्षी एप्रिलमध्ये १० हजार ५०० रुपये झाला आहे. सर्वाधिक भाववाढ बिहारमध्ये झाली आहे. तेथे वर्षभरात ८८ टक्के भाव वाढले आहेत. मध्य प्रदेशात ३५ टक्के भाववाढ तर कर्नाटकात २३ टक्के भाववाढ झाली.

टॅग्स :foodअन्नInflationमहागाई