शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सुशीलकुमार अन् प्रणिती शिंदेंना भाजपाने ऑफर दिली?; चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 16:35 IST

सुशीलकुमार शिंदेंच्या या विधानावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

दोन वेळा पराभव झाला तरी मला आणि प्रणिती शिंदेला भाजपानं पक्ष प्रवेशाची ऑफर दिली. परंतु आमच्या रक्तात काँग्रेस असल्याने ते शक्य नाही असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरात केला आहे. 

ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो. जिथं आमचं बालपण, तारुण्य गेले. आता ८३ वर्षाचा आहे. आता दुसऱ्याच्या घरात कसं जाणार? हे शक्य नाही. प्रणितीही अशा पक्षबदलाच्या भानगडीत कधी पडणार नाही. राजकारणात असं होत राहते, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. सुशीलकुमार शिंदेंच्या या विधानावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की, भाजपाने सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदेला ऑफर दिली नाही. भेटी होणे ही वेगळी गोष्ट आहे. मात्र पक्ष म्हणून आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. तसेच आमच्य पक्षाला तशी गरज नाही, पण कुणीही जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल तर आम्ही तयार आहे. कोणाला भाजपात यायचं असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करु, असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले. 

दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांना दोनदा ऑफर दिली परंतु ते काँग्रेस सोडून कुठे जाणार नाहीत. प्रणितीही कुठे जाणार नाही याची मला खात्री आहे. पण भाजपाचा आत्मविश्वास ढळलेला आहे. प्रशासकीय कामावर भाजपाला विश्वास राहिलेला नाही. महाराष्ट्रातील नेत्यांवर विश्वास नसल्याने इतर पक्षातील नेत्यांना भाजपासोबत घेतेय. एकनाथ शिंदे, अजित पवारांना घेतले आणि काँग्रेस नेत्यांना घेण्याचा प्रयत्न आहे. परंतु आता भाजपाचा पराभव दिसत असताना कुणीही त्यांच्यासोबत जायला तयार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेPraniti Shindeप्रणिती शिंदे