शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सुशांत राजपूत-दिशा सालियान मृत्यूचं कनेक्शन; नव्या दाव्यावर मंत्री शंभुराज देसाई स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:38 IST

पोस्टमोर्टमवेळी असणाऱ्या माणसानं पुढे येऊन जे काही सांगितले. या सगळ्या गोष्टींची पडताळणी करायला हवी असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं.

नागपूर - सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणी त्यावेळी काही गोष्टी समोर आल्या नव्हत्या. सुशांत आणि दिशा हत्येचं कुठेतरी कनेक्शन आहे. त्यावेळी तपास करताना कुणाच्या तरी दबावामुळे, हस्तक्षेपामुळे काही गोष्टी समोर आल्या नसतील त्या आता पुढे येत आहेत तर याचा तपास होणं गरजेचे आहे असं सांगत मंत्री शंभुराज देसाई यांनी कूपर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याने केलेल्या दाव्यावर स्पष्ट भाष्य केले आहे. 

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, पोस्टमोर्टमवेळी असणाऱ्या माणसानं पुढे येऊन जे काही सांगितले. या सगळ्या गोष्टींची पडताळणी करायला हवी. यातील सत्य बाहेर काढणे. वस्तूस्थिती समोर येणे गरजेचे आहे. निश्चित आमचे पोलीस हे फॅक्ट समोर आणतील असा विश्वास आहे. जी यंत्रणा तपास करतेय त्या आता नवनवीन बाबी, विधानं समोर येतायेत त्या सगळ्या रेकॉर्डवर घेतील. खूनाच्या, आत्महत्येच्या केसमध्ये कसा संदर्भ लागतील ते पाहतील. तपास यंत्रणा सर्व वस्तूस्थिती समोर येतील. ज्या गोष्टी आधी लपल्या होत्या त्या आता समोर यायला लागल्या आहेत असं त्यांनी सांगितले. 

काय होता दावा?सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता कूपर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यानं नवा खुलासा केला आहे. सुशांतच्या मृतदेहावर मुका मार लागल्याच्या खूणा होत्या. हा मृतदेह आत्महत्येचा नसून हत्येचा असल्याचं वरिष्ठांना सांगितलं परंतु माझं काम मी करतो, तुझं काम तू कर. माझं काम केवळ पोस्टमोर्टम करणं आणि मृतदेह शिवणे हेच होते. दीड दोन तास पोस्टमोर्टम झालं. त्याचं व्हिडिओग्राफी केली नाही फक्त फोटोग्राफी केली असं कर्मचारी रुपकुमार शाह यांनी म्हटलं. 

रुपकुमार शाह यांनी सांगितले की, सुशांत सिंह हा खूप मोठा अभिनेता होता. त्याच्यासारख्या माणसाने आत्महत्या केल्यानं याकडे निरखून बघणं आमचं काम आहे. मी २८ वर्षात ५०-६० मृतदेहाचं पोस्टमोर्टम केले आहे. सुशांतचा मृतदेह पाहिल्यावर ही हत्या असल्याचं दिसलं. हातापायाला मार लागलेला माणूस गळफास लावून घेऊ शकत नाही. सुशांतने आत्महत्या केली असावी हे मला पटलं नाही. मी वरिष्ठांना कळवलं. तेव्हा केवळ पोस्टमोर्टम करून द्या असं काम होतं ते करून दिले असं त्यांनी म्हटलं. टीव्ही ९ च्या मुलाखतीत शाह यांनी हा दावा केला आहे. मृत्यू संशयास्पद असल्याचं मृतदेहाच्या पोस्टमोर्टमवेळी व्हिडिओग्राफी केली जाते. सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यावेळी पूर्णवेळ मी तिथेच होतो. पोस्टमोर्टमवेळी २ महिला आणि ३ पुरुष डॉक्टर होते. आमच्यात संभाषण झालं होते. ही हत्या असल्याची चर्चा झाली. तेव्हा तुम्ही तुमचं पोस्टमोर्टमचं काम करा. आम्ही अहवाल बनवतो असं डॉक्टरांनी म्हटलं. त्याप्रमाणे आम्ही मृतदेहावर पोस्टमोर्टम केले. जे काही नमुने होते ते पोलिसांकडे सुपूर्द केले असं रुपकुमार शाह यांनी सांगितले.  

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतPoliceपोलिसDisha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरण