शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

Sushama Andhare : "प्रिय कबीरा, त्यांच्या भात्यातील शेवटचे शस्त्र म्हणजे 'तुझा बाप'"; सुषमा अंधारेंच्या लेकीसाठी खास पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 11:33 IST

Sushama Andhare : सुषमा अंधारे यांच्यानंतर आता त्यांच्या भावानेही आपल्या भाचीसाठी पत्र लिहिलं आहे. अंधारे यांचे बंधू प्रा. शिवराज बांगर पाटील यांनी भाची कबीरा हिला पत्रं लिहिलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्या विभक्त पतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धडाडीचे नेतृत्व असून सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याची भूमिका असल्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला असं विधान वकील वैजनाथ वाघमारे यांनी केले आहे. यानंतर सुषमा अंधारे यांनी आपल्या लेकीसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. "बाळा,  तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तूझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी  लढायचं ठरवलंय..!" असं म्हणत लेकीचा एक फोटो शेअर केला होता. 

सुषमा अंधारे यांच्यानंतर आता त्यांच्या भावानेही आपल्या भाचीसाठी पत्र लिहिलं आहे. अंधारे यांचे बंधू प्रा. शिवराज बांगर पाटील यांनी भाची कबीरा हिला पत्रं लिहिलं आहे. "आज वैयक्तिक हल्ले करण्याची रणनीती आखली जात आहे. त्यांच्या भात्यामधील शेवटचे शस्त्र म्हणजे "तुझा बाप" हेच अस्त्र या व्यवस्थेने खूप लवकर तिच्यावरती वापरलेय. तुझ्या बापाला ही आम्ही जवळून ओळखतो त्याची राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक उंची आम्हाला माहीत आहे" असं म्हटलं आहे. तसेच "केवळ सुषमा अंधारे चा पती" म्हणून काल मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभा राहण्याचा बहुमान मिळाला. तुझ्या आईच्या आयुष्यातील शेवटचे सुख आणि दुख व्यक्त करण्याचे व्यासपीठ तू" असं देखील पत्रात म्हटलं आहे. 

मामाने लिहिलेलं पत्र

प्रिय, कबीरा सुषमा अंधारे हिस.....

बाळा मी ना तुझ्या आईच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, ना तुझ्या आईचा. परंतु तुझी आई  ज्या पद्धतीने एका नाकारलेल्या व्यवस्थेतून बाहेर पडून स्वतःचे व्यक्तिमत्व आणि अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे "ही खरंच आम्हा भटक्याच्या लेकरासाठी अभिमानाची गोष्ट आहे".मी तुझ्या आईच्या अनेक भूमिका पाहिल्या तिने कधीच आपल्या तत्त्वासोबत तडजोड केलेली मला आज पर्यंत जाणवली नाही, ती शब्दात कुणाला सापडत नाही, की सीबीआय, ed  तिचं काय बिघडवू शकत नाही.बाबासाहेबांच्या विचाराची धगधगती मशाल घेऊन महाराष्ट्रातील राजकिय जळमट जाळण्यासाठी निघाली आहे....ज्या ज्या वेळेला आमच्यासारखे चळवळीतील लोक अडचणीत आले तेव्हा ती आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आली आहे..आज तिच्यावर वैयक्तिक हल्ले करण्याची रणनीती आखली जात आहे. त्यांच्या भात्या मधिल शेवटचे शस्त्र म्हणजे "तुझा बाप" हेच अस्त्र या व्यवस्थेने खूप लवकर तिच्यावरती वापरलेय. तुझ्या बापाला ही आम्ही जवळून ओळखतो त्याची राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक उंची आम्हाला माहित आहे.परंतु "केवळ सुषमा अंधारे चा पती" म्हणून काल मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभा राहण्याचा बहुमान मिळाला.....तू एक विचार कर आज जर तुझा बाबा सुषमा अंधारे चा पती नसता आणि तो एखाद्या शेतामध्ये काम करणाऱ्या सामान्य भगिनी चा पती असतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांने त्याला बोलावलं असतं का?आम्ही आनंदी असतो कधी काळी ज्या जोडीदाराने आम्हाला नाकारलेले आहे आज तेच आमच्या यशाच्या कडेला धरून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहतात आणि लोक त्यांना केवळ आमचे जोडीदार म्हणून जवळ करतात.एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुम्हाला संपवण्यासाठी कुठलीच बाजू शिल्लक नसते त्यावेळेला त्याच्या वैयक्तिक जीवनाचा, त्याच्या वैयक्तिक प्रश्नांचा बाजार हे राजकीय मंडळी   मांडतात या सर्व घटना मी  स्वत: सहन केल्या आहेत.आज ज्या धिराने आणि समर्थपणे तुझी आई सगळ्या गोष्टीला सामोरे जात आहे, निश्चितच बहीण म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे.येणारा काळ हा जेवढा संधीचा आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त संकटांचा आहे, तुझ्या आईच्या आयुष्यातील शेवटचे सुख आणि दुख व्यक्त करण्याचे व्यासपीठ तू आहेस. ज्या कष्टाने तुला ती वाढवत आहे, उभा करत आहे याची जाणीव तुला असायला हवी म्हणून हा शब्द प्रपंच आहे.बाकी तुझी आई एक "रणरागिणी आहे" या नथीमधुन केलेल्या वाराला ती कधीच भीक  घालणार नाही, तिच्या लढ्यामध्ये आमच्यासारखे पक्ष संघटना सर्व सोडून, लाखो भाऊ पाठीशी उभा आहेत. फक्त तू तिची काळजी घे एवढीच तुझ्याकडून अपेक्षा....तुझा मामा,प्रा. शिवराज बांगर पाटील.बीड...

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारे