सूर्यकांता पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
By Admin | Updated: August 25, 2014 03:58 IST2014-08-25T03:58:59+5:302014-08-25T03:58:59+5:30
पाटील म्हणाल्या, गेली काही वर्षे पक्षातील संवाद संपला आहे़ यापूर्वी आम्ही सर्व मिळून निर्णय घेत होतो़ परंतु परिवारातील संवाद संपतो तेव्हा विसंवाद होतो़ या सर्व बाबी शरद पवार यांच्या कानावरही घातल्या

सूर्यकांता पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
नांदेड : माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांनी शनिवारी रात्री पक्षाला सोडचिठ्ठी दिली़ गेल्या पंधरा वर्षांचा प्रवास उद्विग्नतेमधून संपविताना अतिशय दु:ख होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. माझ्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे त्यांनी रविवारी पत्रपरिषदेत सांगितले़
पाटील म्हणाल्या, गेली काही वर्षे पक्षातील संवाद संपला आहे़ यापूर्वी आम्ही सर्व मिळून निर्णय घेत होतो़ परंतु परिवारातील संवाद संपतो तेव्हा विसंवाद होतो़ या सर्व बाबी शरद पवार यांच्या कानावरही घातल्या. परंतु त्यांच्यासाठीही सध्याची परिस्थिती अतिशय त्रासदायक आहे.
परिवारात काही मुले खोडकर असतात, अशी टीका त्यांनी अजित पवारांचे नाव न घेता केली. भाजपा नेत्यांशी सदिच्छा भेट घेतल्याचे स्पष्ट करीत मला आवतने खूप आलीत, असा दावा त्यांनी केला. कोणत्या पक्षात जाणार याचा अंतिम निर्णय येत्या तीन ते चार दिवसांत घेणार आहे. योग्य प्रस्ताव स्वीकारून निवडणुकीबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)