शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन जहाल महिला नक्षलींचे गडचिरोलीत आत्मसमर्पण, दोघींवर सहा लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 18:33 IST

अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी गडचिरोेली पोलिसांसमोर मंगळवारी आत्मसमर्पण केले आहे. या महिला नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसला आहे. या दोघींवर सहा लाख रूपयांचे बक्षीस होते. 

गडचिरोली - अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी गडचिरोेली पोलिसांसमोर मंगळवारी आत्मसमर्पण केले आहे. या महिला नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसला आहे. या दोघींवर सहा लाख रूपयांचे बक्षीस होते. जया ऊर्फ शांती मासू मट्टामी (२४) ही डिसेंबर २०१२ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर रूजू झाली. मे २०१३ मध्ये भामरागड दलममधून तिची बदली प्लाटून क्र. १४ मध्ये झाली. ६ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या पोलीस व नक्षलवादी चकमकीनंतर वरिष्ठ माओवाद्यांच्या उपस्थितीत तोंडर जंगल परिसरात नक्षल्यांची मिटींग झाली होती. यावेळी जया मट्टामीची प्लाटून क्र. १४ च्या उपकमांडर पदावर नेमणूक करण्यात आली. तिच्यावर ११ खुनाचे गुन्हे, जाळपोळीचे सहा गुन्हे तसेच नैनेर चकमक, बेजुरपल्ली चकमक, नयगुंडा फाटा चकमक, दोडगेर चकमक यासारख्या १२ चकमकीमध्ये सहभाग होता. ती एकूण २९ गुन्ह्यांमध्ये सहभागी होती. तिच्यावर चार लाख रूपयांचे बक्षीस होते. रनिता ऊर्फ सुनीता नामदेव कोडापे (१८) ही डिसेंबर २०१३ मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर रूजू झाली. फेब्रुवारी २०१६ पासून ती सिरोंचा दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर आठ खुनाचे गुन्हे, चार जाळपोळीचे गुन्हे त्याचबरोबर गुरजा चकमक, नयगुंडा फाटा चकमक, कल्लेड चकमक अशा एकूण ११ चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.  तिने एकूण २३ गुन्हे केले आहेत. रनिता ही १३ वर्षांची असताना माओवाद्यांनी तिला नक्षल चळवळीमध्ये जबरदस्तीने सहभागी करून घेतले. यावरून नक्षलवादी संविधान व लोकशाही यांच्या विरोधात जाऊन अनेक निष्पाप आदिवासींना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून दूर ठेवत असल्याचे दिसून येत आहे. जया ही प्लाटून क्र. १४ ची उपकमांडर होती. नक्षल चळवळीला त्रस्त होऊन उपकमांडरने आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे तिच्या अखत्यारित असलेले इतरही नक्षलवादी आत्मसमर्पण करतील, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीCrimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्र