सुरेशदादा जैन धुळे रुग्णालयात
By Admin | Updated: February 10, 2015 02:17 IST2015-02-10T02:17:28+5:302015-02-10T02:17:28+5:30
जळगाव घरकूल प्रकरणातील सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सोमवारी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे़

सुरेशदादा जैन धुळे रुग्णालयात
धुळे : जळगाव घरकूल प्रकरणातील सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सोमवारी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे़ त्यांचा रक्तदाब कमी होत असून, त्यांच्या विविध तपासण्यादेखील करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ़ अनंत बोर्डे यांनी दिली़
सुरेशदादा जैन यांना सकाळी ११ वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यांना छातीत दुखणे, पोटाचा त्रास सुरू झाला आहे़ तसेच सकाळी त्यांच्या शरीरातील शर्करा कमी होऊन रक्तदाबदेखील वाढला होता, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)