शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

संख्याबळ नसूनही सुरेश धस जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 5:32 AM

विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सुरेश धस यांच्या विजयाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

- सतीश जोशीबीड - विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सुरेश धस यांच्या विजयाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. तर पुरेसे संख्याबळ असूनही राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर नामुष्की ओढावली आहे.न्यायालयीन प्रक्रियेत गुरफटलेल्या या निवडणुकीची सुटका तब्बल अठरा दिवसानंतर म्हणजे १२ जून रोजी झाली. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातील मतदारांचा समावेश असलेली ही निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच चर्चेत होती. भाजपाचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी देऊन धनंजय मुंडे यांनी भाजपाला धक्का दिला, तर राष्टÑवादीतून निलंबित झालेले सुरेश धस यांना अधिकृत पक्ष प्रवेशापूर्वीच भाजपाने उमेदवारी देऊन जशास तशी परतफेड केली. याच रमेश कराडानी शेवटच्या क्षणी माघार घेत राष्टÑवादीला गोत्यात आणले. रिंगणात उमेदवारच नसल्यामुळे राष्टÑवादीने अशोक जगदाळे यांना पाठिंबा देऊन नामुष्की टाळण्याचा केविलवाणी प्रयत्न केला.निवडणूक रिंगणात सुरेश धस आणि अशोक जगदाळे हे आमनेसामने असलेतरी प्रत्यक्षात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी भावा-बहिणीत प्रतिष्ठेची लढत होती. दोघांनीही ही निवडणूक आपल्या राजकीय अस्तित्वासाठी प्रतिष्ठेची बनवली होती. कागदावरील संख्याबळात विरोधकांचे पारडे अधिक जड असताना देखील केवळ डावपेचाच्या जोरावर पंकजा मुंडे यांनी सर्वांचेच सहकार्य घेऊन अशक्यप्राय वाटणारा विजय सुकर करून सुरेश धसांना विजयश्री मिळवून दिली.संख्याबळात आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे हे दोनशे मतांनी अधिक असतानाही ७४ मतांनी पराभूत झाले याचा अर्थच भाजपाने विरोधकाची जवळपास तिनशे मते सुरुंग लावून आपल्याकडे वळविली होती. दुसरीकडे जगदाळे यांच्या पराभवास बीड जिल्ह्यातील राष्टÑवादी अंतर्गतची गटबाजी देखील तेवढीच जबाबदार आहे.क्षीरसागरांची नाराजी भोवलीमाजी मंत्री आ. जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ. परंतु, गटबाजीमुळे तेही दीड वर्षापासून पक्षापासून चार हात दूरच आहेत. या निवडणुकीत बीड पालिकेतील २७ आणि जिल्ह्यातील १८ असे जवळपास ४५ मतांचे गाठोडे त्यांच्या ताब्यात होते. इकडून तिकडून मते वळविण्याची या बंधूंची ताकद होती परंतु, ते अलिप्त राहिले. त्यांना या निवडणूक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न झाला नाही. या अंतर्गत गटबाजीचा नेमका फायदा भाजपाने उचलला.अशी झाली मतांची फाटाफूटनिवडणुकीपूर्वी सुरेश धस यांच्याकडे ३८५ इतकीच मते असताना, त्यांनी ५२६ मते मिळवली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्याकडे (राष्ट्रवादी ३३६ अधिक काँग्रेसचे १९१) ५२७ मतांचे बळ असूनही त्यांना ४५२ मतं मिळाली. याचाच अर्थ धस यांनी विरोधकांची १४१ मते आपल्या पारड्यात वळविली.

टॅग्स :PoliticsराजकारणSuresh Dhasसुरेश धसBeedबीड