आयआयटी जेईई परीक्षेत सुरज अग्रवाल चमकला

By Admin | Updated: June 20, 2014 22:08 IST2014-06-20T21:25:06+5:302014-06-20T22:08:19+5:30

जेईई मध्ये मूर्तिजापूर येथील स्व. नंदलाल अग्रवाल यांचा नातू तथा संतोष अग्रवाल यांचा पुत्र सुरज अग्रवाल याने घवघवीत यश संपादन केले आहे.

Suraj Agarwal spins in IIT JEE exam | आयआयटी जेईई परीक्षेत सुरज अग्रवाल चमकला

आयआयटी जेईई परीक्षेत सुरज अग्रवाल चमकला

मूर्तिजापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मधील प्रवेशासाठी सन २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात आयआयटी जेईई मध्ये मूर्तिजापूर येथील स्व. नंदलाल अग्रवाल यांचा नातू तथा संतोष अग्रवाल यांचा पुत्र सुरज अग्रवाल याने घवघवीत यश संपादन केले आहे. सर्वसाधारण मेरिट यादीमधून त्याने ६२४७ रँक मिळविली आहे. या यशामुळे मूर्तिजापूरचे नाव देशपातळीवर उज्ज्वल आहे. या अगोदर सुरजचा चुलत भाऊ आदित्य राजेंद्र अग्रवाल यानेही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आपल्या यशाचे श्रेय तो शिक्षकवृंद आणि परिवारातील वडीलधारी मंडळी, आई-वडील यांना देत आहे. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Suraj Agarwal spins in IIT JEE exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.