शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:45 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एका परदेशी व्यक्तीचा संदर्भात देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी इव्हीएम मशिन संदर्भात भाष्य केले आहे...

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता, एका परदेशी व्यक्तीचा संदर्भात देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी इव्हीएम मशिनसंदर्भात भाष्य केले आहे. "एका परदेशी व्यक्तीने फोन करून मशिनमध्ये गडबड असल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की काही मशिनमध्ये गडबड होऊ शकते. पण मला निवडणूक आयोगावर विश्वास आहे," असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्या एका प्रचार सभेत बोलत  होत्या.

"ताई, मशिनमध्ये गडबड..." -'त्या' एका परदेशी व्यक्तीचा संदर्भ देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, "एका माणसाचा फोन येतो मला. तो कुणीतरी परदेशी आहे. तो सारखं फोन करून म्हणतो की, 'ताई, मशिनमध्ये गडबड आहे, मशिनमध्ये गडबड आहे.' मी त्याला म्हणते, 'मी मशिनमुळेच निवडून आले. मी कसं म्हणणार मशिनमध्ये गडबड आहे?'" 

आता खरं खोटं मला माहिती नाही, पण... -सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "आता खरं खोटं मला माहिती नाही, पण अशी एक कथा चालली आहे की, काही मशिन्समध्ये गडबड करतील. असं तो माणूस म्हणतोय. मी म्हणत नाही. हे 170 सीट येतात, असे म्हणत आहेत, कारण त्यांनी काहीतरी नियोजन केलेले आहे." यानंतर, "माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही, कारण माझा आजही इलेक्शन कमिशन आणि त्या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास आहे," असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupriya Suleसुप्रिया सुळे