शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकतं"; सुप्रिया सुळेंची सणसणीत टीका, कुणाला केलं लक्ष्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 17:48 IST

पवार कुटुंबातील फूट, महायुतीतील अंतर्गत कलह या विषयांवर मांडली रोखठोक मतं

Supriya Sule NCP: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामतीतून उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित आहे. याच दरम्यान, त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट दिले जाईल अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदा बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना पाहायला मिळू शकतो. असे असतानाच आज सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना, पवार कुटुंबातील फूट, खाजगी आयुष्यातील घटनांचे मुद्दे, नुकताच सादर झालेला राज्याचा अर्थसंकल्प आणि महायुतीतील अंतर्गत कलह यावर आपले रोखठोक मत मांडले.

'यापेक्षा गलिच्छ काय असू शकतं?'

देश आणि राज्य लोकशाहीकडून दडपशाहीकडे सध्या जात आहेत. कोणी कसे वागायचे हा ज्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही लोकशाही आहे, त्यामुळे या लोकशाहीत चर्चा तर झालीच पाहिजे. वैचारिक प्रगल्भता ही वयानुसार तरी आलीच पाहिजे. पण राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सभागृहाच्या गॅलरीमध्ये मंत्री आणि आमदारांमध्ये भांडणं होतात. यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकते, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी महायुतीतील अंतर्गत कलहावर मत मांडले.

पवार कुटुंबात फूट....

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात कोणतीही फूट नाही. मला, शरद पवारांना, रोहित पवारांना कुणाच्याही खाजगी आयुष्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. कारण आम्ही लोकप्रतिनिधी असलो तरी आमच्या कुटुंबातील लोकांना त्यांचे खाजगी आयुष्य जगण्याचा आणि ते खाजगी ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपण आपले वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य हे एकत्र करू शकत नाही. त्यामुळे आमच्या कौटुंबिक वेळेत ज्या काही गोष्टी होतात, त्या आम्ही सांगू शकत नाही," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"मी लोकशाहीत काम करते. मी माझे वैयक्तिक संबंध कधीच लपवलेले नाहीत. माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांसोबत असतात. पण मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी असल्याने माझे काही लोकांशी राजकीय आणि वैचारिक मतभेद आहेत. माझे कुणाशीही मनभेद नाहीत. लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो. प्रत्येकाची एक स्टाईल आहे. लोकशाहीत मी सगळ्यांच्याच संपर्कात आहे. कारण मी लोकप्रतिनिधी आहे. विकासकामे किंवा इतर कामांसाठी चर्चा होतात," असेही सुप्रियाताई सुळे  म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस