शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा? आजच घोषणेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 12:05 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करत पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचं ठरवले. शरद पवारांच्या या घोषणेने राष्ट्रवादी नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला. शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा अशी विनवणी कार्यकर्त्यांनी केली. काही ठिकाणी कार्यकर्ते उपोषणाला बसले तर काहींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव २-३ दिवस विचार करू असं शरद पवारांनी सांगितले. मात्र आता राष्ट्रवादी पक्षात नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहे. शरद पवार निवृत्तीच्या घोषणेवर ठाम असल्याने पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण अशी चर्चा सर्वत्र आहे. त्यात प्रामुख्याने सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आहे. पक्षातील नेत्यांच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते. इतकेच नाही तर बैठकीनंतर राष्ट्रवादीची पत्रकार परिषद होईल त्यात सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणाही होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. 

त्याशिवाय अजित पवार यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. अजित पवार हे केंद्रात नेतृत्व करण्यास इच्छुक नाहीत. राज्याच्या राजकारणात अजित पवारांना रस आहे. त्यात राज्यातील राजकारणात अजित पवारांचे वर्चस्व आहे. अजित पवार यांचा आमदारांवर प्रभाव आहे. त्यामुळे अजित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रीय राहणार तर सुप्रिया सुळे केंद्रात पक्षाचे नेतृत्व करतील असं सांगितले जात आहे. 

सुप्रिया सुळे अनेक वर्षापासून दिल्लीत सक्रीय आहेत. वेगवेगळ्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. अकाली दल, द्रमुक यासारखे पक्षातील वारसदारही त्यांचे निकटवर्तीय आहेत त्यामुळे सुप्रिया सुळे या जमेच्या बाजू आहेत. तर अजित पवार यांनी सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद सांभाळले आहे. त्यामुळे आमदारांना बांधून ठेवण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी केला तरी पुन्हा पक्षात आल्यानंतर आमदारांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी अजितदादांचे नाव पुढे केले होते. त्यामुळे अजित पवार हे राज्यात पक्षसंघटना बांधणीसाठी सक्रीय राहतील असं राजकीय चर्चा सुरू आहे. 

सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाचा फायदा होऊ शकतोसंसदीय कामकाजात सुप्रिया सुळे उत्तम काम करतायेत. अनेक पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. देशभरात त्यांचा प्रवास आहे. अनेक ठिकाणी त्या प्रचाराला जात असतात. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाने पक्षाला चांगला फायदा होऊ शकतो. मित्रपक्षही सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाचे स्वागत करतील असा विश्वास राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार