शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

Supriya Sule On Narendra Modi : मोदीजी, तुम्ही महाराष्ट्राचा एवढा द्वेष का करता?; सुप्रिया सुळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 23:56 IST

सुप्रिया सुळे यांनी वाचून दाखवला पंतप्रधानांचा पूर्ण कार्यक्रम.

“मोदीजी महाराष्ट्रात आले. त्यांचं स्वागत आहे. अतिथी देवो भव असं म्हणणाऱ्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवार हे त्यांना घेण्यासाठी पुण्याच्या विमानतळावर गेले. त्यांचा मानसन्मानही केला. त्यांनी आपल्याला काय केलं?,” असा सवाल राष्ट्रीय काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांचा कार्यक्रम काय होता याची यादीही आपल्याकडे असल्याचं त्या म्हणाल्या.

“पावणे दोन वाजता दर्शन, २ वाजता मंदिराचं लोकार्पण, दर्शन अभंगगाथा, नंतर पब्लिक फंक्शन, २.०८ मिनिटांनी पंतप्रधान स्टेजवर येतील, २.०८-२.१२ त्यांचा सत्कार होईल, २.१२ ते २.१५ नितीन मोरेजी, २.१५-२.२० देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते, २.२०-२.२३ संत चोखामेळा गाथा, २.२३-३ वाजेपर्यंत पंतप्रधानांचं भाषण. यात अजित पवार यांचं नाव कुठेही दिसत नाही,” असं कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना सुप्रिया सुळे म्हणाल्या. बसण्याच्या सोयीतही गंमत होती. एक नंबरच्या सीटवर नरेंद्र मोदी, २ नंबरला प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवार याचं नाव आणि ३ नंबरला देवेंद्र फडणवीस. १ नंबरच्याचं भाषण बसायची जागा बरोबर भाषणही बरोबर, दोन नंबरच्याला बसायची जागा बरोबर पण भाषण नाही आणि तीन नंबर बसायची जागा आणि भाषणही हे लिहिलेलं असल्याचंही त्या म्हणाल्या.

“आमचं भाषण आम्ही विनंती पाठवली, ती तुम्ही कट करून पाठवली आणि व्यासपीठावर म्हणता भाषण करा हा आपला अपमान नाही का? टीव्हीसमोर तुम्ही भाषण करा म्हणताय पण तुमचंच ऑफिस दादांचं भाषण कट करून पाठवलंय. हे भाऊ म्हणून बोलत नाही. ते महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते आपल्या पक्षाचे नेते आहेत, पण ते तीन नंबरला. पहिले ते महाराष्ट्राचे आहेत, नंतर पुणे जिल्ह्याचे आहेत आणि नंतर ते आपले आहेत. आपला हक्क त्यांच्या जबाबदारीमुळे तीन नंबरला असल्याचंही त्यांनी नमूद केलं.… तर काही हरकत नव्हती“जर देशाचे पंतप्रधान येथे येतात, जर फडणवीसांचं भाषण नाही म्हटलं असतं तर समजू शकलो असतो तुम्ही दोघांनाही नाही म्हटलं. पंतप्रधानांची वेळ कमी असेल मान्य आहे. जर फडणवीस भाषण करू शकतात, तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर भाषण केलंच पाहिजे, हा माझा मराठी अस्मितेचा विषय आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमत्र्यांना तुम्ही नाही म्हटलं. हा पक्षपात नाही झाला का? भाजपतील देवेंद्र फडणवीस भाषण करू शकतात, पण महाविकास आघाडीतील अजित पवार भाषण करू शकत नाही. पंतप्रधानांना मला विचारायचंय मी नाराज नाही, पण मला आश्चर्य वाटतंय. तुम्हाला महाराष्ट्राचा इतका का द्वेष आहे याचं आश्चर्य वाटतंय. आज महाराष्ट्राचा अपमान झाला आहे,” असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र