शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेला हल्ला, त्यांच्या अपमानाचे प्रकरण संसदेत मांडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 20:56 IST

Supriya Sule on CJI BR Gavai: सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती, बारामतीत करणार मूक आंदोलन

Supriya Sule on CJI BR Gavai: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. बारामतीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे आणि युवा नेते युगेंद्र पवार यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरन्यायाधीशांच्या अपमानाचे प्रकरण संसदेत मांडणार असल्याचे यावेळी सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

"देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. हा देश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालणारा आहे. कोणाच्याही मनमानीने चालणार नाही. विरोध करण्याची जी नवी पद्धत देशात सुरू झाली आहे, ती चुकीची आहे. ही प्रवृत्ती वाढू नये यासाठी आपण समाज म्हणून चर्चा केली पाहिजे. अशा घटना रोखण्यासाठी काय करता येईल यासाठी पुढील अधिवेशनात संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी मी करणार आहे," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"राज्य सरकारकडे शक्तीपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी रुपये आहेत. मात्र, शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाचे काय झाले? लाडक्या बहिणींना पैसे का दिले जात नाहीत? आनंदाचा शिधा कुठे गेला?  अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थ खात्याकडून निधी न मिळाल्याने आनंदाचा शिधा बंद झाल्याची कबुली दिली आहे. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने आनंदाचा शिधा योजना थांबवण्यात आली आहे. राज्याचे वित्तीय व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून, सरकार मोठ्या आर्थिक अडचणीत आहे असे मंत्रीच सांगताहेत. यावर सरकारने उत्तर द्यावे," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Attack on CJI Gavai: Issue to be raised in Parliament!

Web Summary : Supriya Sule condemned the attack on CJI Gavai and announced protests. She will raise the issue in Parliament, demanding discussion to prevent such incidents. Sule also criticized the state government's financial management and questioned stalled welfare schemes.
टॅग्स :CJI BR GavaiCJI भूषण रामकृष्ण गवईSupriya Suleसुप्रिया सुळे