शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Supriya Sule: "माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस", खासदार सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 11:18 IST

Supriya Sule: "माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही, कदाचित त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल."

सोलापूर:राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी नाव न घेता राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्यावर टीका केली. तसेच, ईडी आणि इनकम टॅक्सच्या रेडबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. "माझ्या भावाच्या घरी कधीच ईडीची रेड झाली नाही, पण, माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस आलीय," असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे सोलापूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंनी गुडी पाढव्याच्या सभेत बोलताना, 'अजित पवारांच्या घरावर इडीची रेड होते, मात्र सुप्रिया सुळेंच्या घरावर होत नाही', असा आरोप केला होता. 

सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तरत्या वक्तव्याबाबत बोलताना खासदार सुळे यांनी मोठा खुलासा केला. "माझ्या भावाच्या(अजित पवार) घरी कधीच रेड झालेली नाही. कदाचित त्या लोकांना(राज ठाकरे) कुणीतरी चुकीची माहिती दिलेली असेल. त्यांचा बेसच चुकीचा आहे, त्यामुळे कंपॅरिझनचा प्रश्नच येत नाही. उलट मी केंद्र सरकारच्या विरोधात भाषण देते, त्यामुळे माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस आलीय," असा मोठा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

भोंगा महत्वाचा की महागाई?दरम्यान, अलीकडेच अहमदनगर येथे सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता शाब्दिक हल्ला केला होता. आपण दोन वर्षांनंतर कोरोना महामारीतून बाहेर पडत आहोत. अशा परिस्थितीत हे समाजात द्वेष पसरवत आहेत. स्वत: काहीही कामे करीत नाहीत, केवळ भाषणे करतात. लोकांना देव, धर्मावरून भडकावतात. आपण मंदिरात प्रसन्न मुद्रेने जातो; पण यांचा मंदिरात गेल्यावर चेहरा पाहा. त्यावर काहीही हावभाव नसतात, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. तसेच, भोंगा महत्त्वाचा की महागाई असा प्रश्न प्रत्येकाने घरात विचारला तर ‘महागाई’ असेच उत्तर येईल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेRaj Thackerayराज ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेIncome Taxइन्कम टॅक्स