शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणाला भाजपाकडून पद, सुप्रिया सुळे संतप्त, म्हणाल्या...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 19:26 IST

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी अटकेची कारवाई झालेल्या आणि ५० दिवस तुरुंगात राहिलेल्या नाशिकमधील निखिल भामरे या तरुणाकडे आता भाजपाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी अटकेची कारवाई झालेल्या आणि ५० दिवस तुरुंगात राहिलेल्या नाशिकमधील निखिल भामरे या तरुणाकडे आता भाजपाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपाकडून त्याची सोशल मीडिया  सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाकडून झालेल्या या नियुक्तीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. 

याबाबत सोशल मीडियावरून दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की,  आदरणीय पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाला भाजपाने सोशल मीडिया सेलचा पदाधिकारी म्हणून नियुक्ती दिली आहे. देवेंद्रजी - तुम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, संसदेत काल केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहा सिद्धांताबद्दल बोलले, आपण सिद्धा़तांचे पालन करताय का? एका गुन्हेगारी मानसिकतेच्या व्यक्तीला राजाश्रय दिला जातो, ही अतिशय खेदाची आणि गंभीर बाब आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

नाशिकमधील निखिल भामरे या तरुणाने सोशल मीडियावर शरद पवार यांच्याबाबत त्यांचं नाव न घेता एक वादग्रस्त पोस्ट टाकली होती. त्यामुळे त्याच्याविरोधी राज्यातील विविध भागात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच पोलिसांनी त्याला अटक केली होती. पुढे सुमारे ५० दिवस निखिल भामरे हा तुरुंगात होता. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSharad Pawarशरद पवार