शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा नवीन व्हिप नेमू शकतात का?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 08:19 IST

बहुमत चाचणीच्या अगोदरच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे असं म्हणता येत नाही असं कोर्टाने सांगितले आहे.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाबाबत अखेर १० महिन्यांनी सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावला आहे. या निकालात कोर्टाने राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर असल्याचे सांगत पक्षाचा व्हिप नेमण्याचा अधिकार विधिमंडळ पक्षाला नाही तर राजकीय पक्षालाच आहे असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्याने व्हिप नेमू शकतात का? असा प्रश्न उभा राहिला आहे. 

यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे म्हणाले की, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह दिले आहे. तो निर्णय तसाच आहे. त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यामुळे शिंदे पुन्हा नव्याने व्हिप नेमू शकत नाही. निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदेंकडे दिली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित आहे. कोर्टाने त्यावेळच्या परिस्थितीवरून भरत गोगावलेंची निवड बेकायदेशीर ठरवली आहे. मात्र आता राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंकडे आहे. ते पुन्हा व्हिप नेमू शकतात. कायदेशीरदृष्ट्या एकनाथ शिंदेंना संरक्षण आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता तर आजचे चित्र वेगळे असते. राज्यपालांनी बहुमत चाचणी अपुऱ्या माहितीवर बोलावली असं कोर्ट म्हणाले. परंतु बहुमत चाचणीच्या अगोदरच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे असं म्हणता येत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे सरकारला नवसंजीवनी मिळाली आहे. उद्धव ठाकरेंचा राजीनामा प्रयोग चुकला आहे असंही कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले. 

घटनापीठाने दिला एकमताने निर्णयसाऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठाने एकमताने संतुलित निकाल दिला. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे सोपविला. या सुनावणीत केंद्रस्थानी आलेले नबम रेबिया प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपविण्यात आले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय