'नीट' संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी गुरुवारी

By Admin | Updated: May 3, 2016 18:52 IST2016-05-03T15:50:52+5:302016-05-03T18:52:00+5:30

सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पुढील तारीख दिल्यामुळे ही सुनावणी गुरवारी ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

The Supreme Court on Thursday in the next hearing on 'NET' | 'नीट' संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी गुरुवारी

'नीट' संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी गुरुवारी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पुढील तारीख दिल्यामुळे ही सुनावणी गुरवारी ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. नीट परीक्षेला विविध राज्यांनी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी विरोध केला आहे. नीट परीक्षेची सक्ती मागे घ्यावी यासाठी विविध राज्य आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फेरविचाराच्या याचिका फेटाळून लावत आपण निर्णय कायम ठेवला होता. महाराष्ट्र सरकारकडून वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी एमएचसीईटी प्रवेश परीक्षा पाच मे रोजी घेतली जाणार आहे. राज्य सरकारचा 'नीट'ला विरोध आहे.
न्या. अनिल आर. दवे यांच्या नेतृत्वाखालील विशेष खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी होईल, असे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी आज सांगितले आहे.

 

Web Title: The Supreme Court on Thursday in the next hearing on 'NET'