नगराध्यक्ष सानंदांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
By Admin | Updated: March 19, 2016 00:39 IST2016-03-19T00:39:17+5:302016-03-19T00:39:17+5:30
खामगाव नगरपालिकेच्या इमारत बांधकामातील भ्रष्टाचारपक्ररणी नगराध्यक्ष अशोककु मार सानंदा यांना दिलासा.

नगराध्यक्ष सानंदांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
खामगाव: नगरपालिकेच्या इमारत बांधकाम लेखा परीक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा यांच्यासह माजी नगराध्यक्ष श्रीमती सरस्वती खासने यांना अटक न करण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
नगर परिषद इमारत बांधकाम कथित अपहारप्रकरणी तक्रार दाखल असल्यामुळे नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष सरस्वती खासने, माजी नगरसेवक दिनेश अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. शुक्रवारी न्या. जगदिशसिंह केहर व न्या. सी. नागाप्पन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठीय न्यायालयात सुनावणी झाली असता, नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्ष सरस्वती खासने, माजी नगरसेवक दिनेश अग्रवाल यांना अटक न करण्याचे आदेश शुक्रवारी दिले आहेत, त्यामुळे नगराध्यक्षांसह इतरांना याप्रकरणी दिलासा मिळाला आहे.