शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
5
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
6
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
7
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
8
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
9
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
10
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
11
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
12
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
13
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
14
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
15
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
16
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
17
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
18
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
19
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
20
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

महापूरप्रश्नी महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:23 IST

४ आठवड्यांत अहवाल द्या; अन्यथा मुख्य सचिवांना हजर राहण्याचे निर्देश

सांगली : महापुरासंदर्भात मुदतीत म्हणणे सादर न केल्याबद्दल सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र व कर्नाटक सरकारला फटकारले. चार आठवड्यांत उपाययोजनांबाबतचा अहवाल सादर न केल्यास दोन्ही सरकारने त्यांच्या मुख्य सचिवांना न्यायालयीन सुनावणीसाठी हजर करावे, असे आदेशही दिले.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. व्ही. रमण्णा आणि न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. ३० ऑगस्ट २०१९ रोजी न्यायमूर्तींनी सांगली, कोल्हापूर, सातारा येथील महापुराबाबत महाराष्ट्र व कर्नाटक सरकारला म्हणणे मांडण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती. दोन महिने होऊनसुद्धा त्यांनी केलेल्या उपाययोजनांबाबत कोणतीही माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली नाहीत. त्यामुळे न्यायमूर्तींनी दोन्ही सरकारला फटकारले व सरकारी वेळकाढूपणाबद्दल गंभीर ताशेरे ओढले. येत्या चार आठवड्यात म्हणणे सादर न केल्यास महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या दोन्ही मुख्य सचिवांनी स्वत: सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याची ताकीद दिली आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचा आयुक्तांनीसुद्धा चार आठवड्यात म्हणणे मांडावे, असे आदेशात नमूद केले आहे.पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते व याचिकाकर्ते अमोल पवार यांच्यावतीने अ‍ॅड. सचिन पाटील यांनी याप्रश्नी न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारकडून महापुराचे नियोजन व पुनर्वसनासंदर्भात आजअखेर कोणतीही सविस्तर माहिती उपलब्ध न केल्याने प्राथमिक मदत म्हणून केंद्र सरकारने ९०० कोटी रुपये देण्याचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला आहे. परंतु आजपर्यंत केंद्र सरकारकडून एक रुपायासुद्धा मदत आलेली नाही. महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या माध्यमातून एकूण ६ हजार ८१३ कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्र शासनाने नुकसानीचा अंतिम अहवालच केंद्र शासनाला अद्याप सादर केलेला नाही. त्यामुळे केंद्र शासनाने जाहीर केलेली रक्कम वर्ग करता आलेली नाही. केंद्र शासनाने याबाबत स्पष्टता दिली आहे. महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी आजवर जेवढी परिपत्रके काढली, त्यांची पूर्णत: अंमलबजावणी झालेली नाही. पंचनाम्याचा अहवालही तयार नाही. दफ्तरदिरंगाईमुळे पूर्णत: मदत मिळालेली नाही. फक्त सांगली जिल्ह्यात एकूण १२ हजार घरांची पडझड झाल्याचे व हजारो जनावरे दगावल्याची माहिती आहे. अन्य जिल्ह्यांचा विचार करता, ही आकडेवारी मोठी आहे. अंतिम अहवालच तयार नसल्याने केंद्र शासनाची मदत मिळाली नाही.यांच्याविरोधात आहे याचिकाअमोल पवार यांनी २८ ऑगस्ट २०१९ रोजी ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये केंद्र शासन, महाराष्ट्र व कर्नाटक सरकार, केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, केंद्रीय जलआयोग, राज्य आपत्ती निवारण प्राधिकरण, कृष्णा खोरे विकास महामंडळ, जिल्हा आपत्ती निवारण केंद्र, सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्हाधिकारी, सांगली व कोल्हापूर येथील महापालिका आयुक्त यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व त्यातून झालेल्या नुकसानीबाबत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आता चार आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयSangli Floodसांगली पूर