शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: मराठा आरक्षणावरची स्थगिती हटविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, जानेवारीत पुढील सुनावणी

By मोरेश्वर येरम | Updated: December 9, 2020 15:59 IST

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने दिलेली अंतरिम स्थगिती दिल्याने नोकरभरती देखील रखडली होती.

ठळक मुद्देमराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठविण्यास कोर्टाचा नकार२५ जानेवारीपासून मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणीला सुरुवातमराठा आरक्षणावरुन ठाकरे सरकारला आणखी एक धक्का

नवी दिल्लीमराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाकडून आणखी एक धक्का मिळाला आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती तूर्तास कायम ठेवत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी सुरू होणार असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिल्याने नोकरभरती देखील रखडली होती. आज कोर्टाने स्थगिती उठविण्यास नकार दिला. त्यात स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीलाही परवानगी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरुन ठाकरे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकिलांनी विविध उदाहरणं देऊन मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली. पण सध्या या प्रकरणात कोणतीही सुनावणी देण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नकार दिला. मराठा आरक्षणाचं प्रकरण हे गंभीर आणि मोठं आहे. त्यामुळे याबाबत विस्तृत सुनावणीच केली जाईल, असं कोर्टाने यावेळी नमूद केलं आहे.

"अनिश्चिततेची तलवार किती दिवस मराठा समाजाच्या डोक्यावर ठेवणार?''मराठा आरक्षणावरील स्थगितीमुळे विद्यार्थ्यांचं आणि नोकर भरतीबाबत होत असलेल्या नुकसानीचा विषय अॅड. मुकूल रोहतगी यांनी कोर्टासमोर उपस्थित केला. त्यावर कोर्टाने आम्ही कोणतीही भरती थांबविण्याचा निकाल दिलेला नाही. पण मराठा आरक्षणानुसार ही भरती करता येणार नाही, असं म्हटलं आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय