सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
By Admin | Updated: February 19, 2016 17:27 IST2016-02-19T17:27:18+5:302016-02-19T17:27:18+5:30
वांद्रे हिट अॅण्ड रन प्रकरणी सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. सलमान खानला 6 आठवड्यांमध्ये या नोटीशीचे उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे

सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - वांद्रे हिट अॅण्ड रन प्रकरणी सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. सलमान खानला 6 आठवड्यांमध्ये या नोटीशीचे उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
2002 वांद्रे हिट अॅण्ड रन प्रकरणी सबळ पुरावे नसल्यामुळे सलमान खानची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. तसंच सत्र न्यायालयाने सुनावलेली पाच वर्षांची शिक्षाही रद्द केली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा विरोध करत महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यानच सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस पाठवली आहे.
सलमान खानवर 2002मध्ये वांद्रे येथे मद्यधुंद असवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एकाचा मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे.