राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे रुडींकडून समर्थन
By Admin | Updated: November 21, 2014 02:47 IST2014-11-21T02:47:33+5:302014-11-21T02:47:33+5:30
एखाद्या वाईट व्यक्तीने जर आपली तारीफ केली तर त्याचा स्वीकार करायचा नाही का
_ns.jpg)
राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे रुडींकडून समर्थन
मुंबई : एखाद्या वाईट व्यक्तीने जर आपली तारीफ केली तर त्याचा स्वीकार करायचा नाही का, असा सवाल करील केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्राचे माजी प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:हून भाजपाला देऊ केलेल्या पाठिंब्याचे समर्थन केले. राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा नव्हता तर आम्ही काय सत्ता सोडायची होती का, असा प्रतिसवालही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
रुडी म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासाकरिता कुणी समर्थन दिले तर ते स्वीकारण्यास आमची तयारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपाने गंभीर आरोप केले होते; हे खरे असले तरी ते स्वत:हून पाठिंबा जाहीर करणार असतील तर तो घ्यायचा नाही का? राजकीय व्यवहारात असे वर्तन करणे योग्य होत नाही. वाईट व्यक्ती तुमची स्तूती करीत असेल तर ते त्याचा आपण स्वीकार करणार नाही, असे म्हणता येत नाही. सोशल मीडियावर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याबद्दल होणाऱ्या टिकेचा पत्रकारांनीच अभ्यास करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. (विशेष प्रतिनिधी)