शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: रेमडेसिविर, ऑक्सिजनचा तातडीने पुरवठा करा - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 05:04 IST

लसींची आयात करण्याची परवानगी राज्याने मागितली तर ती मिळायला हवी. कारण महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या ५ कोटी ७१ लाख असून १२ कोटी लसींची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राला तातडीने रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोरोनासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीत देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते.

कोरोनाविरुद्धची लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूच, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला. महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिविरचा पुरेसा पुरवठाही आवश्यक आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता लसी आयात करून लसीकरण वाढवता येईल, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

लसींची आयात करण्याची परवानगी राज्याने मागितली तर ती मिळायला हवी. कारण महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या ५ कोटी ७१ लाख असून १२ कोटी लसींची गरज आहे. महाराष्ट्राला दररोज ७० हजार कुपींची गरज आहे. मात्र दररोज २७ हजार कुपींचाच पुरवठा होतो, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागण्याnरेमडेसिविर पुरवठा रुग्णसंख्येनुसार करा. इतर आवश्यक औषधांचा नियमित पुरवठा करावा.nऑक्सिजन आणण्यासाठी वायुदल व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत घ्यावी. ऑक्सिजनचा २५० ते ३०० मे. टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणे गरजेचे आहे.nकेंद्राने १३ हजार जम्बो सिलिंडर व सुमारे ११०० व्हेंटिलेटर्स महाराष्ट्राला द्यावेत. खासगी कॉर्पोरेट समूहांना सीएसआरच्या माध्यमातून लस खरेदीची परवानगी द्यावी. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनremdesivirरेमडेसिवीर