शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 05:23 IST

महाराष्ट्रासह परप्रांतांतील कंपन्यांचा सहभाग

विलास गावंडे/गणेश वासनिकलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ/अमरावती : कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. कुठे बोगस औषधांचा पुरवठा झाला का, यादृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून शासकीय, निमशासकीय रुग्णालयातून औषधांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. याची विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. यामध्ये स्थानिक पातळीवर खरेदी केलेली औषधी बोगस असल्याचे विश्लेषकांनी घोषित केले. खरेदी केलेले औषधे महाराष्ट्रासह परप्रांतातील कंपन्या आणि चिल्लर विक्रेत्यांनी पुरविल्या आहेत. 

शासनाच्या पत्रात नावे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षकांनी काढलेल्या निष्कर्षात संबंधित औषधांचे मूळ घटकच त्यामध्ये नसल्याची बाबही पुढे आली. औषधांची खरेदी स्थानिक पातळीवर शासकीय, निमशासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आली.बोगस औषधांच्या पुरवठ्यातील घाऊक विक्रेता ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील मे. एक्टिव्हेंटिस बायोटेक प्रा. लि. आहे. या वितरकाच्या घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी १५ नमुने बनावट असल्याचे आढळले. शासनाच्या पत्रात कंपन्यांची नावे देण्यात आली आहेत. 

या कंपन्यांचे नमुने बोगसमे. स्टिफन फॉर्म्युलेशन (उत्तराखंड), मे. रिफंट फार्मा प्रा.लि. (केरला), मे. म्रिष्टल फॉर्म्युलेशन्स (उत्तराखंड), मे. बायोटेक फॉर्म्युलेशन (आंध्र प्रदेश), मे. मेलवॉन बायोसायन्सेस (केरला), मे. स्काय क्यूअर सोल्यूशन्स (केरला), मे. एस. एम. एन. लॅब्स लि. देहरादून (उत्तराखंड), मे. श्री. ग. लॅब लि. डेहराडून (उत्तराखंड).

बोगस औषधी पुरविणारे चिल्लर विक्रेतेजया एंटरप्रायजेस लातूर, विशाल एंटरप्रायजेस कोल्हापूर, एक्टिवेटिस बायोटेक प्रा.लि. भिवंडी (जि. ठाणे), केंबिज जेनेरिक हाऊस मीरा रोड ठाणे, ग्लाशिअर फार्मा प्रा. लि. अमरावती, राजेश फार्मा प्रा. लि. अमरावती, मिल्टन जनरिक प्रा.लि. कालबादेवी रोड मुंबई, श्री गणेश फार्मा अँड सर्जिकल एलएलपी मीरा रोड ठाणे याशिवाय पुणे येथील प्रतिमानगरातील प्रतिमा फार्मास्युटिकल यांची औषधेही बनावट असल्याचे आढळले.  

आरोग्य यंत्रणेला अलर्टआरोग्य विभागाने ई-निविदाअंती खरेदी करून औषधांचा रुग्णालयांना पुरवठा केला. त्यांचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले. त्यापैकी १५ नमुने बनावट आढळले, असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश मावेकर यांनी ४ जुलैला पत्राद्वारे आरोग्य सेवा संचालनालयाच्या आयुक्तांना कळविले.त्याअनुषंगाने आरोग्य सेवा आयुक्तालयाचे सहसंचालक (खरेदी कक्ष) डॉ. उमेश शिरोडकर यांनी ३ ऑक्टोबरला राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे बनावट औषधीबाबत अलर्ट केले आहे. बनावट औषध पुरवठा करणाऱ्या एजन्सी, पुरवठादारांची यादीही पाठविली.लेबल वेगळे, औषधांचे मूळ घटक नव्हते : विश्लेषकांच्या अहवालानुसार लेबल वेगळे आणि औषधांचे मूळ घटक नव्हते. औषध निरीक्षकांद्वारे झालेल्या तपासणीत औषधांच्या लेबलवर नमूद उत्पादक हे अस्तित्वात नाहीत, असे निदर्शनास आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake drugs supplied to government hospitals, purchased locally.

Web Summary : Government hospitals received fake medicines purchased locally. Analysis revealed missing ingredients and nonexistent manufacturers. Alert issued to health officials regarding counterfeit drug suppliers. Fifteen samples were found to be fake.
टॅग्स :medicineऔषधं