एफआयआर टाळण्यास अधीक्षकांनीच सांगितले

By Admin | Updated: November 29, 2015 02:35 IST2015-11-29T02:35:23+5:302015-11-29T02:35:23+5:30

शीना बोरा हिचा मृतदेह २०१२ मध्ये आढळल्याचे माहिती असूनही रायगडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे यांनी आपल्याला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून

Superintendent said to avoid the FIR | एफआयआर टाळण्यास अधीक्षकांनीच सांगितले

एफआयआर टाळण्यास अधीक्षकांनीच सांगितले

-  डिप्पी वांकाणी,  मुंबई
शीना बोरा हिचा मृतदेह २०१२ मध्ये आढळल्याचे माहिती असूनही रायगडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे यांनी आपल्याला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून न घेण्यास सांगितले होते, अशी पोलीस निरीक्षक सुरेश मिरघे यांनी केंद्रीय गुप्तचर खात्याकडे (सीबीआय) दिलेल्या आपल्या निवेदनात दिली आहे.
मिरघे यांनी निवेदनात शिंदेंनी केवळ स्टेशन डायरीत नोंद करून नमुने मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलला रासायनिक आणि डीएनए विश्लेषणासाठी पाठविण्यास सांगितले होते, असे म्हटले. मिरघे यांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या पाच पानी निवेदनाची प्रत ‘लोकमत’ने मिळविली आहे. एकच नमुना जे. जे. हॉस्पिटल आणि कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठविण्याचे कारणे काय आहे, अशी विचारणा त्यांनी केली आहे. या प्रश्नांची उत्तरे माझे वरिष्ठ आणि ज्या डॉक्टरने शवविच्छेदन केले तेच देऊ शकतील, असेही त्यात म्हटले. पोलीस पाटील गणेश धेने यांनी सीबीआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मी व्यासपीठाची सजावट करून परतत असताना झाडांवरील पडलेले आंबे गोळा करण्यासाठी गागोदे खेड्यात थांबलो असताना तेथे मृतदेह आढळला होता.
धेने निवेदनात म्हणाले की,‘‘मी पोलीस चौकीला याची माहिती सकाळी ११ च्या सुमारास दिली. तेथे मला ही माहिती पोलीस नाईक व्ही. आर. भगत यांना देण्यास सांगण्यात आले. भगत यांनी चौकीचे प्रमुख एस. डी. मगर यांना कळविले. नंतर अधिकाऱ्यांनी पंचनामा केला व मृतदेह तेथेच पुरण्यात आला.
पोलीस नाईक व्ही. आर. भगत यांनी त्यांच्या निवेदनात धेने यांनी मला माहिती दिल्याचे व मी ती मगर यांना कळविल्याचे म्हटले आहे. (मगर यांची त्या दिवशी साप्ताहिक सुटी होती). नंतर ते मृतदेह आढळला त्या ठिकाणी पोहोचले व निरीक्षक मिरघे आणि उपनिरीक्षक धांडे यांना कळविले. धांडेही त्या ठिकाणी पोहोचले. मी डॉक्टर ठाकूर यांच्याकडे मृतदेह सोपविला. त्यांनी अवशेष गोळा केले. २८ आॅगस्ट २०१५ रोजी मी मुंबई पोलिसांच्या तुकडीला मृतदेह पुरलेली जागा पुन्हा एकदा दाखविली. तुकडीने मृतदेह बाहेर काढला, असेही भगत त्यात म्हणतात. Þमगर माझ्याशी दूरध्वनीवर २३ मे २०१२ रोजी बोलले. पोलीस पाटील धेने यांना त्यांनी खापोली- पेण रस्त्यावरील गागोदे खिंड येथे जळालेली मुलगी आढळल्याचे सांगितले. पंचनामा व शवविच्छेदनासारख्या गोष्टी पूर्ण केल्या. मला त्यांनी फोन केला व तो सांगाडा असल्याचे सांगितले. मला पेण पोलीस ठाण्याच्या एका प्रकरणात (क्रमांक ३४/२०१०) खालापूरला जायचे होते व त्याच रस्त्यावर ते खेडे होते. मी पोलीस उपनिरीक्षक मेंगदळे आणि शिरकाळे यांच्यासोबत तेथे गेलो. तीच बाब मी फोनवर उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हाण यांनाही कळविली.’’
मिरघे आणखी म्हणाले की,‘‘चव्हाणदेखील काही वेळाने तेथे आले आणि आम्ही सगळ््यांनी त्या जागेची पाहणी केली. ज्या दिवशी मी त्या जागेला भेट दिली व मृतदेह बघितला ती जागा मी ओळखू शकतो. अगदी नखापासून ते केसांपर्यंत तो मृतदेह स्त्रीचा असल्याचे मला दिसले. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. मी डॉक्टरांशी संपर्क साधला. चव्हाणदेखील माझ्यासोबत होते. मी दुसऱ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी तेथून निघालो. मला शिंदे यांचा फोन आला. मी सांगड्याबद्दल सांगितले. मी माझ्याकडील चौकशी पूर्ण करून परतत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हाण हे त्या जागी पंचनामा करताना दिसले. या प्रकरणात प्रथम माहिती अहवाल नोंदला गेलेला आहे की नाही हे शिंदेंना फोन करून विचारा, असे त्यांनी मला सांगितले. लगेचच एफआयआर नोंदवू नका असे शिंदेंनी सूचविले. तसेत करण्यास चव्हाण यांनी सांगितले.

महत्त्वाच्या गोष्टी
पोलीस पाटील झाडावरून जमिनीवर पडलेले पिकलेले आंबे गोळा करण्यासाठी थांबला असताना त्याला शीनाचा मृतदेह आढळला.
मिरघेंनी चव्हाण यांच्या समोरच शिंदेंना माहिती दिली आणि शिंदेंनी त्यांना एफआयआर न नोंदवता केवळ स्टेशन डायरीत एन्ट्री करण्यास सांगितले.
जे. जे. हॉस्पिटल आणि कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत एकच नमुने पाठविण्यात आले. हाच प्रश्न मिरघेंनी आपल्या निवेदनात उपस्थित केला आहे.
मिरघेंनी त्यांच्या पोलीस शिपायांनी प्रकरणाचा पाठपुरावा केल्याचे परंतु नंतरच्या तीन वर्षांत जे. जे. हॉस्पिटलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे म्हटले.

Web Title: Superintendent said to avoid the FIR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.