सुपरशेफ विष्णू मनोहरांचा विश्वविक्रम,

By Admin | Updated: April 23, 2017 11:26 IST2017-04-23T11:26:46+5:302017-04-23T11:26:46+5:30

शेफ विष्णू मनोहर सलग ५२ तास कुकींग करून एक हजार शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करत आहेत. अमेरिकेच्या बेंजामीन जे पेरी यांचा सलग ४० तासांचा कुकींगचा विश्वविक्रम मोडीत काढत नवीन इतिहास रचला आहे.

Superhef Vishnu Manohar's World Record, | सुपरशेफ विष्णू मनोहरांचा विश्वविक्रम,

सुपरशेफ विष्णू मनोहरांचा विश्वविक्रम,

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 23 - शेफ विष्णू मनोहर सलग ५२ तास कुकींग करून एक हजार शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करत आहेत. अमेरिकेच्या बेंजामीन जे पेरी यांचा सलग ४० तासांचा कुकींगचा विश्वविक्रम मोडीत काढत नवीन इतिहास रचला आहे. रात्री २ वाजून ५६ मिनिटांनी त्यांनी बेंजामीन पेरी यांचा हा विक्रम मोडून आता आपल्या सलग ५२ तासांच्या कुकिंग मॅरेथॉनकडे मार्गक्रमण कायम ठेवले आहे. यापूर्वीचा ४० तासांचा नॉन स्टॉप कुकिंगचा असा विक्रम अमेरिकेच्या बेंजामीन जे पेरी यांच्या नावावर होता. शेफ विष्णू मनोहर यांनी हा विक्रम रात्री मोडित काढला आहे. 

या विक्रमाकरता ३७५ प्रकारच्या भाज्या, ग्रोसरी, मसाले हे उपयोगात आणले जात आहेत. आठ चुलींवर हे कुकींग मॅरेथॉन सुरू आहे. एकाच वेळी तीन ते चार पदार्थ तयार केले जात आहेत. यावेळी सुमारे तीनशे ते चारशे किलो जेवण तयार होणार आहे. मैत्री परिवारातर्फे इन्स्टिट्युट ऑफ इंजिन‌िअर्स येथे या मॅरेथॉन स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 
 शुक्रवारी सकाळी 7.15 वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली.  सलग तीन दिवस हा खाद्यपदा‌र्थांचा उत्सव चालणार आहे. या मॅरेथॉन उपक्रमात जवळपास सर्व भारतीय खाद्यपदार्थ तयार केले जातील. केवळ 40 पदार्थ हे भारताबाहेरील असतील.
 
  
विक्रमाची वैशिष्ट्यं
 
 
- स्वयंपाकासाठी आठ शेगड्यांची तयारी
- एसींनी सुसज्ज स्वयंपाकगृह, चित्रिकरणासाठी कॅमेरे, १२० मदतनीस
- दर एक तासाने पाच मिनिटांचा ब्रेक
- प्रचंड प्रमाणात लागणा-या स्वयंपाकाचे साहित्य 
- उपस्थितांना चाखायला मिळेल पदार्थांची चव
- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सराव
- यू ट्युबवर जाणार व्हिडीओ
- संत गजानन महाराज यांच्या पोथीचे सलग पारायणाचे आयोजन
 
 

Web Title: Superhef Vishnu Manohar's World Record,