सनीच्या सासूबाईंना नातवंडांना खेळवण्याची इच्छा
By Admin | Updated: December 14, 2015 15:19 IST2015-12-14T15:01:18+5:302015-12-14T15:19:27+5:30
अंगप्रदर्शन आणि आपल्या बोल्ड अदांनी घायाळ करणारी सनी लिऑन लवकरच आई बनण्याचा निर्णय घेऊ शकते.

सनीच्या सासूबाईंना नातवंडांना खेळवण्याची इच्छा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - अंगप्रदर्शन आणि आपल्या बोल्ड अदांनी घायाळ करणारी सनी लिऑन लवकरच आई बनण्याचा निर्णय घेऊ शकते.
सनीच्या सासूबाईंना आजी बनण्याची इच्छा आहे. माझ्या सासूबाईंना नातवंडांना खेळवायचे आहे. त्यासाठी त्या आमच्या मागे लागल्या आहेत. त्यांच्या मते मी आणि माझा नवरा डॅनियल वेबर आई-बाबा बनण्याचा निर्णय घेण्यासाठी भरपूर वेळ घेत आहोत. मला आणि डॅनियलला सुध्दा मूल हवे आहे मात्र माझ्याकडे सध्या प्रचंड काम आहे असे सनीने सांगितले.
सनीने अद्याप आई बनण्याचा निर्णय घेतला नसला तरी, सासूबाईंनी जास्तच दबाव टाकला तर सनी लवकरच मातृत्वाचा निर्णय घेऊ शकते. येणा-या दिवसात सनीचे काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.