शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

एकनाथ शिंदेंनी भरत गोगावलेंची पाठराखण करताच सुनील तटकरे म्हणाले, "आम्ही सुसंस्कृत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:00 IST

आम्हाला यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाची दिशा दिली आहे, राष्ट्रीय महामार्गावर उतरून रस्त्यावर टायर जाळणे ही आमची संस्कृती नाही असं तटकरेंनी म्हटलं.

मुंबई - रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील तणाव वाढला आहे. आदिती तटकरेंना पालकमंत्री पद जाहीर होताच रायगडमध्ये शिवसेना आमदार आणि समर्थकांमध्ये नाराजी पसरली. त्यातच काही संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून टायर जाळले, महामार्ग रोखला. या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदाच्या मागणीची पाठराखण केली. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या वादावर भाष्य केले आहे.

पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, मुख्यमंत्री दावोसला राज्यात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी गेलेत. मुख्यमंत्री आल्यानंतर पालकमंत्रिपदाबाबत चर्चा होईल. आम्ही सगळे सुसंस्कृत आहोत, विचाराच्या माध्यमातून वागणारे असल्याने राष्ट्रीय महामार्गावर उतरून रस्त्यावर टायर जाळणे ही आमची संस्कृती नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करू. उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यांच्याशी बोलतील.  एकनाथ शिंदेंशीही चर्चा करू. त्यातून जो काही निर्णय होईल त्यात सर्वजण समाधानी असतील. एकनाथ शिंदे नेहमीच त्यांच्या मूळगावी जातात. ते शेतीत रमतात त्यामुळे त्यांचे दरे गावी जाणे मला काही वेगळं वाटत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच तीन घटक पक्षाचे सरकार असल्याने त्या त्या पक्षाचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. मुख्यमंत्री दावोसला गेले असताना राज्यात अशाप्रकारे प्रश्न उद्भवणे योग्य नाही हे खरे आहे. परंतु राजकारणात काही वेळा काही गोष्टी घडत असतात. आम्ही सुसंस्कृत आहोत आणि विचारधारेशी बांधले गेलो आहोत. आम्हाला यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाची दिशा दिली आहे. त्यामुळे जी काही चर्चा करायची ती निश्चितपणे होईल. इतरांनी कुठल्या गोष्टीचा अवलंब करावा यावर मी भाष्य करणे योग्य नाही असं सांगत अप्रत्यक्षपणे भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या आंदोलनावरून सुनील तटकरेंनी टोला लगावला. 

दरम्यान, ज्यावेळी निवडणुकीच्या प्रक्रियेवर चर्चा होईल तेव्हा बोलू. ज्या स्तरावर मी काम करतोय त्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघाबाबत मला जे काही सांगायचे ते आकडेवारीसहीत सांगेन असं प्रत्युत्तर देत सुनील तटकरे यांनी शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर दिले. सुनील तटकरे यांनी शिवसेना आमदार पराभूत होतील यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप थोरवे यांनी केला होता.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

पालकमंत्रिपदाची अपेक्षा करण्यात वावगं काय आहे? भरत गोगावले यांनी अनेक वर्षे रायगडमध्ये काम केलं आहे. अपेक्षा ठेवणं, मागणी करणं चुकीचं नाही. त्यामुळे मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे आम्ही तिन्ही नेते बसून यावर मार्ग काढू असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार