सुनील मनोहर राज्याचे महाधिवक्ता
By Admin | Updated: November 19, 2014 05:15 IST2014-11-19T05:15:24+5:302014-11-19T05:15:24+5:30
राज्याच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ वकील सुनील व्यंकटेश मनोहर यांची नियुक्ती करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

सुनील मनोहर राज्याचे महाधिवक्ता
मुंबई : राज्याच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ वकील सुनील व्यंकटेश मनोहर यांची नियुक्ती करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सध्याचे महाधिवक्ता डरायस जहांगीर खंबाटा यांचा राजीनामा स्वीकारण्याची शिफारसही राज्यपालांना करण्यात येणार आहे.
सुनील मनोहर हे ज्येष्ठ विधिज्ञ असून, त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर त्यांनी दीर्घकाळ वकील म्हणून काम केले आहे. या क्षेत्रातील २७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी असून, प्रख्यात कायदेपंडित व्ही.आर. मनोहर यांचे ते पुत्र आहेत. (विशेष प्रतिनिधी)