सुनील केदारांना हायकोर्टाचा दिलासा

By Admin | Updated: November 29, 2014 01:14 IST2014-11-29T01:14:50+5:302014-11-29T01:14:50+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी आमदार सुनील केदार यांना दिलासा देताना त्यांच्याविरुद्धची विधानसभा निवडणूक वादासंदर्भातील फौजदारी रिट याचिका फे टाळून लावली.

Sunil Kedar gets relief from the High Court | सुनील केदारांना हायकोर्टाचा दिलासा

सुनील केदारांना हायकोर्टाचा दिलासा

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी आमदार सुनील केदार यांना दिलासा देताना त्यांच्याविरुद्धची विधानसभा निवडणूक वादासंदर्भातील फौजदारी रिट याचिका फे टाळून लावली. 
सावनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर चौधरी 
यांनी ही याचिका दाखल केली 
होती. या मतदारसंघात केदार काँग्रेसचे उमेदवार  होते. न्यायमूर्ती भूषण 
गवई व विनय देशपांडे यांनी याचिकेवर निर्णय दिला. 
तथ्य वादग्रस्त असल्यामुळे प्रकरण रिट अधिकारक्षेत्रत ऐकता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवून याचिकाकत्र्यासाठी निवडणूक याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. 
केदार यांनी निवडणूक निर्णय अधिका:यांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रत खोटी माहिती दिली व ब:याच सत्य गोष्टी दडवून ठेवल्या, असा आरोप चौधरी यांनी याचिकेत केला होता़ (प्रतिनिधी)

 

Web Title: Sunil Kedar gets relief from the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.