सुनील गुप्ता गिनीज बुकमध्ये

By Admin | Updated: August 25, 2014 01:18 IST2014-08-25T01:18:55+5:302014-08-25T01:18:55+5:30

जागतिक मधुमेह दिनी नोवा नारडिस्क एज्युकेशन फाऊंडेशन, डायबिटीक फूड सोसायटीच्या मदतीने देशाच्या विविध २७ ठिकाणी १६७६ ‘डायबिटिक न्यूरोपॅथी स्क्रीनिंग’ केल्याच्या विक्रमाची नोंद गिनीज बुकात झाली.

Sunil Gupta in Guinness Book | सुनील गुप्ता गिनीज बुकमध्ये

सुनील गुप्ता गिनीज बुकमध्ये

सर्वाधिक मधुमेही रुग्णांवर उपचाराचा विक्रम
नागपूर : जागतिक मधुमेह दिनी नोवा नारडिस्क एज्युकेशन फाऊंडेशन, डायबिटीक फूड सोसायटीच्या मदतीने देशाच्या विविध २७ ठिकाणी १६७६ ‘डायबिटिक न्यूरोपॅथी स्क्रीनिंग’ केल्याच्या विक्रमाची नोंद गिनीज बुकात झाली. शहरातील प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी हा विक्रम केला आहे.
शहरातील एका डॉक्टराने आंतरराष्ट्रीय स्तरावील ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळविणे नागपूरकरांच्या दृष्टीने गौरवाची बाब ठरली आहे. या मोहिमेत डॉ. गुप्ता यांच्यासोबत कविता गुप्ता व त्यांची चमूने विशेष सहकार्य केले.
डॉ. गुप्ता मागील २० वर्षांपासून ‘हॅलो डायबिटीज’या जनजागृतीपर कार्यक्रमातून लोकांमध्ये मधुमेहाच्याप्रति जागरूकता निर्माण करीत आहे. ते म्हणाले, २० ते ३० टक्के ‘टाईप २’मधील रुग्ण हे ‘डायबिटीज पेरिफेरल न्यूरोपॅथी’ने पीडित आहेत. रुग्ण थंड आणि गरम यातील फरक ओळखण्याची शक्ती गमावून बसतो. या शिवाय पाय दुखणे, पायातील संवेदनशीलता संपून अपंगत्वही येण्याची शक्यता असते. याची तपासणी जागतिक मधुमेह दिनी देशाच्या विविध २७ ठिकाणी केली. याची नोंद गिनीज बुकात झाली. डॉ. गुप्ता यांनी या यशाचे श्रेय मोहिमेत सहभागी असलेल्या प्रत्येकाला दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Sunil Gupta in Guinness Book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.