शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा, अजित पवारांना क्लिन चिट; याचिकाकर्त्याची याचिकेत बदल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 09:45 IST

काही दिवसांपूर्वीच ईओडब्ल्यूने दुसरा क्लोजर रिपोर्ट दाखल करत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, रोहित पवार व अन्य बड्या राजकीय नेत्यांना क्लीन चिट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी मूळ तक्रारदार सुरिंदर अरोरा यांनी मंगळवारी उच्च न्यायालयाकडे मागितली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात यावी, अशी मागणी आपल्याला करायची आहे, असे तक्रारदारांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

अरोरा यांच्या वतीने ॲड. सतीश तळेकर यांनी न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे याचिका दाखल केली. मात्र, खंडपीठाने आपण या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही, असे म्हटल्याने अरोरा यांना याचिकेत सुधारणा करण्यासाठी पर्यायी खंडपीठाकडून परवानगी घ्यावी लागेल.

तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबई ईओडब्ल्यूने पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर अरोरा यांनी जानेवारी २०२१ मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  काही दिवसांपूर्वीच ईओडब्ल्यूने दुसरा क्लोजर रिपोर्ट दाखल करत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, रोहित पवार व अन्य बड्या राजकीय नेत्यांना क्लीन चिट दिली. त्यामुळे  अरोरा यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला. ईडी व सीबीआय या तपास यंत्रणा सरकारी दबावापासून स्वतंत्र नसल्याने एसआयटी नेमण्यात यावी व या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.

टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारbankबँकCourtन्यायालय