मुंबईत सुफी संतांचे संमेलन
By Admin | Updated: April 13, 2015 11:38 IST2015-04-13T05:26:27+5:302015-04-13T11:38:16+5:30
ख्वाजा सुफी मजिदूल हसन शाह यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी होणाऱ्या उरुस सोहळ्यात १८ एप्रिल रोजी देशभरातील सुफी संतांचे संमेलन व त्यांचा मुशायरा

मुंबईत सुफी संतांचे संमेलन
मुंबई : ख्वाजा सुफी मजिदूल हसन शाह यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी होणाऱ्या उरुस सोहळ्यात १८ एप्रिल रोजी देशभरातील सुफी संतांचे संमेलन व त्यांचा मुशायरा अनुभवण्याची पर्वणी मुंबईकरांना मिळणार आहे. त्यासाठी अनेक सुफी संत या निमित्ताने प्रथमत: अॅण्टॉप हिल येथील मेहफिल-ए-जहांगिरिया येथे एकत्र येणार आहेत.
१८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत त्यांच्या स्वरबद्ध वाणीतील मुशायरा ईश्वराची आळवणी करणार असून, तो प्रत्यक्ष अनुभवण्याची पर्वणी मुंबईकरांना मिळणार आहे. सज्जाद नसीन डॉ. सुफी फैजुल हसन शहा यांनी या संमेलनाचे नियोजन केले
आहे. (प्रतिनिधी)